ए टी एम.मशीन फोडून चक्क चोरट्यांनी ४ लाख रुपये केले लंपास
एकूण ४ लाख ११ हजार ५०० रुपये किंमतीचा मुददेमाल

ए टी एम.मशीन फोडून चक्क चोरट्यांनी ४ लाख रुपये केले लंपास
एकूण ४ लाख ११ हजार ५०० रुपये किंमतीचा मुददेमाल
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील मौजे मुर्टी येथील निरा मोरगाव रोडवर असलेले ए.टी.एम.मशीन फोडून चक्क ए.टी.एम.मशीन मधून ४ लाख ११ हजार ५०० रुपये चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पो स्टे गु.र.नं :- १९/२०२२ भा.द.वी. ३८० नुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार (दि:१६) रोजी रात्री (८:३० ते २:११) च्या दरम्यान ही चोरी झाल्याचे समोर आलंय. बारामती तालुक्यातील मौजे मुर्टी येथील निरा मोरगाव रोडवर असलेल्या अरविंद चव्हाण यांच्या गाळ्यातून टाटा इंडिकॅशन कंपनीचे ए.टी.एम.मशीन फोडून त्यामध्ये असलेले एकूण ४ लाख ११ हजार ५०० रुपये किंमतीचा मुददेमाल अज्ञात चोरट्यानी चोरून नेहला आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजि दाखल करुन दाखल गुन्ह्याचा प्रथम वर्दी रिपोर्ट मा.हु.कोर्टास रवाना करुन गुन्ह्याचा पुढील तपास पो स ई शेलार हे करीत आहेत.