कोरोनाची तिसरी लाट वेळीच थोपवण्याकरिता भवानीनगर पोलीस दूरक्षेत्र व आरोग्य विभागाने उचलले पाऊल
बस मधील प्रवाशांची केली जातेय आर.टी.पी.सी.आर. चाचणी
कोरोनाची तिसरी लाट वेळीच थोपवण्याकरिता भवानीनगर पोलीस दूरक्षेत्र व आरोग्य विभागाने उचलले पाऊल
बस मधील प्रवाशांची केली जातेय आर.टी.पी.सी.आर. चाचणी
इंदापूर : प्रतिनिधी
सणसर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्फत इंदापूर बारामती मार्गावरील प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस थांबवून या बस मधील प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आणि उंबरठ्यावर येऊन ठेपलेली कोरोनाची तिसरी लाट इथेच थोपवण्यासाठी आरोग्य विभागाने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
भवानीनगर पोलीस दूरक्षेत्र आणि आरोग्य विभागाच्या वतीने संयुक्तरीत्या ही मोहिम राबवण्यात येत असून बस मधिल प्रवाशांची आर.टी.पी.सी.आर. कोरोना चाचणी करण्याचा हा एक अभिनव उपक्रम राबवण्यात येतोय.
इंदापूर ते बारामती ही फेरी करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे बस चालक प्रविण तोंडे व वाहक शरद शिर्के निघाले असता गुरूवारी दि.08 जुलै रोजी सणसर प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर पोलीस हवालदार गुलाबराव पाटील यांनी ही बस रोखली,यावेळी बस मध्ये 33 प्रवासी होते.वरिष्ठांच्या आदेशानुसार ही बस थांबवून या चाचण्या करित आहोत असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. याशिवाय रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या इतर नागरिकांच्याही चाचण्या केल्या जात असल्याचे त्यांनी म्हटल आहे.
यावेळी प्रमोद पाठक म्हणाले,की प्रतिदिन प्रवाशांच्या शंभर चाचण्या केल्या जात असून यापैकी 1 ते 2 टक्के अहवाल पाॅझिटीव्ह येत आहेत.सध्या सणसर मध्ये 60 टक्के लसीकरण झाले आहे.यामुळे बाधित रुग्णसंख्या प्रचंड घटली आहे.
आरोग्य सेवक,आशा सेविका,डाॅक्टर यासाठी आटोकाट प्रयत्न करित असून हे कोरोना योद्धे जिथे जागा मिळेल तिथेचं कामाला लागून कोरोनाचा नायनाट करण्यासाठी किती सज्ज आहेत हे या अभिनव उपक्रमातून स्पष्ट दिसून येते.