कोरोंना विशेष
कोरोनाचे संकट संपलेले नाही. दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता !; आरोग्य मंत्री राजेश टोपे
राज्यात आजपासून मंदिरे सुरू करण्यात आली आहे

कोरोनाचे संकट संपलेले नाही. दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता!; आरोग्य मंत्री राजेश टोपे
राज्यात आजपासून मंदिरे सुरू करण्यात आली आहे
मुंबई:- प्रतिनिधी
राज्यात आजपासून मंदिरे सुरू करण्यात आली आहे. मात्र, अजूनही कोरोनाचे संकट संपलेले नाही. दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता आहे, असा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. दसरा आणि दिवाळी नंतर तिसऱ्या लाटेची शक्यता वाटत आहे. या पार्श्वभूमीवर आपण विशेष लसीकरण करत आहोत. जेणेकरून आरोग्यावर जास्त गंभीर परिणाम होणार नाही, असं टोपे यांनी सांगितलं. मुस्लिम बांधवांनी बऱ्यापैकी लसीकरण केलं आहे. मात्र मालेगाव सारख्या काही ठराविक ठिकाणी लसीकरण कमी झाल्याचे देखील दिसून आले आहे. मात्र त्या ठिकाणी देखील धर्मगुरू, मौलवी, सामाजिक संस्था यांच सहकार्य घेऊन लसीकरण केले जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.