ओबीसींची जनगणना व्हावी ही ना कॉंग्रेसची इच्छा ना बीजेपीची : महादेव जानकर
ओबीसी जनगणनेची राष्ट्रीय समाज पक्षाची आग्रही मागणी

ओबीसींची जनगणना व्हावी ही ना कॉंग्रेसची इच्छा ना बीजेपीची : महादेव जानकर
ओबीसी जनगणनेची राष्ट्रीय समाज पक्षाची आग्रही मागणी
इंदापूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे आज इंदापूर दौऱ्यावर असता पत्रकारांना बोलताना म्हणाले की,ओबीसी जातीनिहाय जनगणनेची राष्ट्रीय समाज पक्षाची आग्रही मागणी असून ओबीसी जनगणना व्हावी ही ना कॉंग्रेसची इच्छा आहे ना बीजेपीची म्हणून आगामी काळात रासप जातीनिहाय जनगणनेविषयी आग्रही भूमिका घेणार आहे.
पुढे बोलताना जानकर म्हणाले की, ओबीसी ने प्रस्थापित पक्ष्यांचं चमचा बनलं नाही पाहिजे, जोपर्यंत ओबीसींचे खासदार-आमदार वाढणार नाहीत त्या पक्षांच्या अध्यक्षांना सांगणार नाहीत की तुम्ही ठराव करा तोपर्यंत काही होणार नाही. गेली २० ते ४० वर्षे काँग्रेसने राज्य केले आता हे करत आहेत. त्यामुळे दोघांवरही दबाव आणण्यासाठी आमदार खासदारांचे राजीनामे घ्यावे लागतील तरच जातिनिहाय जनगणना होईल. मी पशुसंवर्धनमंत्री असताना जनावरांची जनगणना केली व आकडेवारी सांगितली. जनावरांची जनगणना होते परंतु माणसांची जातिनिहाय जनगणना काँग्रेस व बीजेपी ने का केली नाही असा सवाल जानकर यांनी यावेळी उपस्थित केला.
त्यामुळे आगामी काळात राष्ट्रीय समाज पक्षाकडून प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना आदेश देणार असून ओबीसी जातीनिहाय जनगणनेची मोहीम हाती घेणार आहोत. जातिनिहाय जनगणना झाल्यानंतरच आपोआप समाजाची प्रगती होईल असेही यावेळी जानकर यांनी सांगितले.
रोजच्या धाकधूकीच्या प्रवासातून एक निवांत मिळावा म्हणून आज उजनी जलाशयात जवळपास दोन ते तीन तास बोटीतून फेरफटका मारत या परिसराचा आनंद घेत असल्याचे जानकर म्हंटले.यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे, पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी माऊली सलगर,तालुकाध्यक्ष सतीश शिंगाडे,तानाजी मारकड यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.