‘कोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढताना विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
सर्वांनी सर्तकता ठेवावी, गाफील राहून चालणार नाही.

‘कोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढताना विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या
-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
सर्वांनी सर्तकता ठेवावी, गाफील राहून चालणार नाही.
बारामती वार्तापत्र
कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. पण तिसऱ्या लाटेचा सामना करताना विकास कामांवर परिणाम होऊ देऊ नका, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
अजित पवार यांनी बारामतीमधील विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. बारामती तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी सर्वांनी सतर्कता बाळगावी, आपल्याला गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्यासोबतच कोरोनाच्या चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढताना त्याचा विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या, असे निर्देश पवार यांनी दिले.
पॉझिटिव्हीटी रेट वाढू देऊ नका
सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पॉझिटिव्हीटी रेट वाढणार नाही याची दक्षता घ्या. नागरिकांनी मास्क वापरावा, कोरोना प्रादुर्भावाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अशा सूचनाही त्यांनी केल्या.
बारामतीमधील विकासकामांच्या पहाणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. धोडपकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रुई ग्रामिण रुग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बारामती नगरपालिकेचे गट नेते सचिन सातव आदी मान्यवरांसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.