कोरोंना विशेषपुणे

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलं बाधित होण्याची शक्यता गृहीत धरून ऑक्सिजन, व्हेंटिलेटरयुक्त बेड, औषधे, रेमिडिसिवीरसह आरोग्य सुविधांवर भर : अजित पवार

“तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांसाठी पुरेशा वैद्यकीय सेवा सुविधा निर्माण करा”

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलं बाधित होण्याची शक्यता गृहीत धरून ऑक्सिजन, व्हेंटिलेटरयुक्त बेड, औषधे, रेमिडिसिवीरसह आरोग्य सुविधांवर भर : अजित पवार

“तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांसाठी पुरेशा वैद्यकीय सेवा सुविधा निर्माण करा”

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलं बाधित होण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने प्रशासनाला सूचना केल्यात. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी आरोग्य सुविधा आणखी सक्षम करण्यासाठी नियोजनाच्या दृष्टीने जिल्ह्यात उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. त्यांनी आज (14 मे 2021) पुण्यातील कोरोना प्रादुर्भाव आणि उपाययोजनांच्या आढावा बैठकही घेतली.

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते म्हणाले, “कोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने नियोजन करण्यात येत आहे. बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात येत आहे. याद्वारे लहान मुलांवरील उपचाराबाबत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधनसामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तयारी करण्यात येत आहे.”

‘म्युकर मायकोसिस’च्या औषधांच्या पुरवठ्यात गैरप्रकार होऊ नये : अजित पवार

“ससून रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, हॉस्पिटल, नायडू रुग्णालय या रुग्णालयांसह जिल्ह्यातील भारती हॉस्पिटल, सिम्बायोसिस हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अशा खासगी रुग्णालयांनी देखील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करावी. ‘म्युकर मायकोसिस’ रोगाचा प्रादुर्भाव कोरोना रूग्णांमध्ये वाढत आहे. या रोगासाठीच्या औषधांचा पुरवठा रुग्णालयांना सुरळीत होण्यासाठी तसेच यात गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी या औषधांचा पुरवठा देखील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे,” अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.

“तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांसाठी पुरेशा वैद्यकीय सेवा सुविधा निर्माण करा”

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात या आठवड्यात रुग्णदर कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. तथापि, ग्रामीण भागात अद्याप संसर्ग वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यातील निर्बंध 1 जूनपर्यंत वाढवण्यात आले आहेत. नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांसाठी पुरेशा वैद्यकीय सेवा सुविधा निर्माण होण्यासाठी कार्यवाही करा. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा वाढवा. ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता, रेमिडिसिव्हीर इंजेक्शन तसेच म्युकर मायकोसिस आजारावरील औषध साठा, लहान बालकांसाठी आवश्यक औषध साठा, वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक तयारी करा, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच ऑक्सिजन, रेमडेसीविरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!