कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीत करण्यास स्थानिकांचा विरोध.
बारामती नगरपालिकेचे विरोधीपक्ष नेते सस्ते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले पत्र..
कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीत करण्यास स्थानिकांचा विरोध..
बारामती नगरपालिकेचे विरोधीपक्ष नेते सस्ते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले पत्र..
बारामती:-प्रतिनिधी
बारामती तालुक्यात दि. ७ जुलै रोजी डोर्लेवाडी येथील (कोविड संशियीत) व दि.८ जुलै रोजी जळोची येथील नागरिकाचा कोवीड-१९ ने मृत्यू झाला होता. त्यांचा अंत्यविधी शहरातील मुख्य असणाऱ्या चाँदशाहवली दर्गा शेजारील अमरधाम स्मशानभूमीत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केलेला होता.
वास्तविक अमरधाम स्मशानभूमीमध्ये शहरातील दरमहा ७० ते १०० नागरिकांचा सरासरी अंत्यविधी होतो. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे दहन केल्यानंतर तिसऱ्या दिवशी सावडण्याचा विधी देखील येथेच पार पडतो. येथे अंत्यविधीला सर्व थरातील जनसमुदाय येत असतो. अशा परिस्थीतीत या स्मशानभूमीमध्ये कोवीड-१९ सारख्या आजाराने निधन झालेल्या नागरिकांचे दहन करणे योग्य नाही असे मत स्थानिक नागरिकांचे असून
सदर स्मशानभुमी ही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने व येथे मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत असल्यामुळे व चोहोबाजूने मुख्य रस्ते असल्यामुळे येथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे की, येथे कोवीड-१९ ने मृत्यु पावलेल्या व्यक्तींचे अंत्यविधी करू नयेत. अशी मागणी प्रांताधिकारी व मुख्याधिकारी बा.न.प. यांचेकडे समक्ष जावून नागरिकांनी केली आहे.
तसेच बारामती नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते सुनील सस्ते यांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेऊ थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तसे पत्र दिले आहे.