कोरोनाने वाढवली बारामतीकरांची डोखेदुखी आज पुन्हा पाच कोरोना पॉझिटिव्ह.
रुग्णाची वाढती संख्या चिंताजनक.
कोरोनाने वाढवली बारामतीकरांची डोखेदुखी आज पुन्हा पाच कोरोना पॉझिटिव्ह.
रुग्णाची वाढती संख्या चिंताजनक.
बारामती:प्रतिनिधी
आज बारामती मध्ये 5 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत त्यामुळे बारामती करांची चिंता वाढत आहे.
आज शुक्रवार 17 जुलै रोजी बारामती शहरातील वसंतनगर भागातील आणखी एका महिलेस कोरोनाची लागण झाली असून तरडोली येथील मृत संशयित कोरोना रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
काल दिवसभरामध्ये ११५ संशयितांच्या तपासणीमध्ये चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, त्यानंतर आज सकाळी पुन्हा बारामतीतील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेस कोरोनाची लागण झाली. तत्पूर्वी आज सकाळी रुई येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या चोपन्न वर्षीय रुग्णाचा त्रास अधिक वाढल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यामुळे तरडोलीसह आसपासच्या गावांमध्ये ही चिंता निर्माण झाली होती, परंतु त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
तरीही नागरिकांनी काळजी घेण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.