बारामती तालुक्यातील निंबुत येथील तलाठी एसीबीच्या जाळ्यात; 10 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला

नावाने असलेल्या जमीनीचे क्षेत्र दुरुस्तीची नोंद करण्यासाठी मागितली लाच

बारामती तालुक्यातील निंबुत येथील तलाठी एसीबीच्या जाळ्यात; 10 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला

नावाने असलेल्या जमीनीचे क्षेत्र दुरुस्तीची नोंद करण्यासाठी मागितली लाच

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील निंबुत येथे कार्यरत असलेले मधुकर मारुती खोमणे (वय-५८) या तलाठ्यावर १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. खोमणे यांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या वडीलांच्या नावाने असलेल्या जमीनीचे क्षेत्र दुरुस्तीची नोंद करण्यासाठी खोमणे याने तक्रारदार शेतकऱ्याकडे १० हजारांची लाच मागितली. ती स्विकारताना आज त्यास रंगेहाथ पकडण्यात आले.

या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस निरीक्षक संदिप वऱ्हाडे पुढील तपास करीत आहेत. निंबूत हे राजकीयदृष्ट्याही आणि शेतीच्या दृष्ट्याही सधन गाव आहे. अशा गावातील तलाठी १० हजारांच्या आत मागणी करीत नसेल तर शेतकऱ्याला कोण आणि किती लुबाडत असेल याचा विचार करा

ही कारवाई पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधिक्षक सुरज गुरव, सुहास नागगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

Related Articles

Back to top button