कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसाला राष्ट्रीय कुटुंब लाभ व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनुदान देणेबाबतची लाभार्थी निवड बैठक संपन्न
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील विधवा महिलांना मंजूर

कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसाला राष्ट्रीय कुटुंब लाभ व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनुदान देणेबाबतची लाभार्थी निवड बैठक संपन्न
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील विधवा महिलांना मंजूर
बारामती वार्तापत्र
मा. जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडील आदेशानुसार कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसाला / पाल्यांना शासन निर्णयानुसार राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना व संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत निकषानुसार अनुदान तात्काळ देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने बारामती तालुका संजय गांधी योजना , श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती योजना लाभार्थी निवड सभा 28 जून 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता, प्रशासकीय भवन येथील बैठक सभागृहात संजय गांधी समितीचे अध्यक्ष धनवान शिवराम वदक यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी संजय गांधी योजना समितीचे सदस्य सुनिल बनसोडे, जीवना मोरे, शिवराज माने, शहाजी दळवी, प्रविण गालिंदे, लालासो होळकर, निलेश मदने, अशोक इंगुले, नुसरत इनामदार तसेच शासकीय सदस्य तहसिलदार विजय पाटील, संजय गांधी योजनेचे नायब तहसिलदार महादेव भोसले उपस्थित होते.
या सभेमध्ये एकूण 73 अर्जाची छाननी करण्यात आली, त्यापैकी 32 प्रकरणे संजय गांधी योजनेंतर्गत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील विधवा महिलांना मंजूर झाली आहेत. संजय गांधी योजनेचे 16 प्राप्त अर्जापैकी 16 मंजूर , श्रावणबाळ योजनेचे 22 प्राप्त अर्जापैकी 16 अर्ज मंजूर तर 06 अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी योजनेचे प्राप्त 03 अर्जापैकी 03 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.