कोरोनाला गांभीर्याने घ्या ,सुप्रिया सुळे यांचे संपूर्ण कुटुंब ,हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह !
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाची लाट येणार आहे; उपमुख्यमंत्री अजित पवार
कोरोनाला गांभीर्याने घ्या ,सुप्रिया सुळे यांचे संपूर्ण कुटुंब ,हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह !
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाची लाट येणार आहे; उपमुख्यमंत्री अजित पवार
प्रतिनिधी
माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली. गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी कोरोना तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हिवाळी अधिवेशनातील दोघांना कोरोना
नुकत्याच 28 डिसेंबर रोजी समाप्त झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी अहमदनगर येथील रुग्णालयात कोरोना तपासणी केली असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले. दोन दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोना झाल्याचे उघड झाले होते. त्यादेखील अधिवेशनात उपस्थित होत्या. त्यामुळे कोरोनाचे हे लोण आता आमदारांमध्ये पसरते की काय अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कोरोना पॉझिटिव्ह
भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.यासंदर्भात त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी म्हंटले आहे की, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.तरी संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी आणि काळजी घ्यावी.
सुप्रिया सुळे यांचे संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह
कालच 29 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, पती सदानंद सुळे व त्यांची दोन्ही मुले कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली होती. सुप्रिया सुळे यांनीही ट्विटरद्वारे ही माहिती दिली होती. आपली व कुटुंबियांची प्रकृती स्थिर असून संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते.