कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी नगरसेवक व सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्याची सुनील सस्ते यांची मागणी
बारामती शहर व तालुका अग्रगण्य क्रमांकावर आहे

कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी नगरसेवक व सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्याची सुनील सस्ते यांची मागणी
बारामती शहर व तालुका अग्रगण्य क्रमांकावर आहे
बारामती वार्तापत्र
बारामती शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी नगरसेवक व सर्व पक्षीयांची तातडीची बैठक आयोजित करण्याची मागणी बारामती नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते सुनील सस्ते यांनी बारामतीचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष यांच्याकडे केली आहे.
सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असून त्यामध्ये भारतात महाराष्ट्र अग्रगण्य असून त्यात पुणे जिल्हा तसेच बारामती शहर व तालुका अग्रगण्य क्रमांकावर आहे.त्यामुळे या गोष्टींचा विचार करता शहर व्हेंटीलेटवर असताना रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, रुग्णांना रेमडिसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करून देणे, कोविड सेंटर उभारणी करणे याबाबत सर्वपक्षीय एक मिटींग सभागृह/ विश्रामगृह अथवा झुम ॲपवर घेवून त्यामध्ये शहरातील प्रमुख अधिकाऱ्यांचा, पत्रकारांचा, आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, मेडिकल असोसिएशनचे सदस्य, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी व काही मान्यवरांचा देखील सहभाग असावा. त्यामुळे आलेल्या आपत्तीवर / समस्येवर ठोस उपाययोजना करणे शक्य होईल,असे निवेदनात नमूद करण्यात आले असून चर्चा मर्यादित न राहता सर्व समावेशक असावी अशी मागणी करण्यात आली आहे.