कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनीच दक्षता घेतली पाहीजे;उपमुख्यमंत्री अजित पवार
शाळा लवकरच सुरू होत असल्याने सर्वांनीच नियमांचे पालन करणे आवश्यक

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनीच दक्षता घेतली पाहीजे;उपमुख्यमंत्री अजित पवार
शाळा लवकरच सुरू होत असल्याने सर्वांनीच नियमांचे पालन करणे आवश्यक
बारामती वार्तापत्र
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनीच दक्षता घेतली पाहीजे. सर्वांनी मास्क लावलाच पाहिजे. जे मास्क वापरणार त्यांच्यावर पोलीस विभागाने दंडात्मक कारवाई करावी. शाळा लवकरच सुरू होत असल्याने सर्वांनीच नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णसेवेच्या माध्यमातून मानवसेवा करणा-या राज्यातील फार्मासिस्ट बंधु-भगिनींना शुभेच्छा दिल्या. कोरोनाकाळात फार्मासिस्ट बांधवानी जीवाची जोखीम पत्करुन रुग्णांना अहोरात्र सेवा दिली. त्यांच्याशिवाय आरोग्य यंत्रणा अपूरी आहे, अशा शब्दात फार्मासिस्ट बंधु-भगिनींच्या रुग्णसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, गटनेता सचिन सातव, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अनिल बागल, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, उपअभियंता राहूल पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर आदी उपस्थित होते.