स्थानिक

बारामतीतील दोन ‘देवदुतांचा’ मुंबईत सन्मान ! डॉ सदानंद काळे, भास्कर जेधे यांचा सन्मान

हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून माझ्या समवेत दिवसरात्र काम करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे.असे डॉ. काळे आणि डॉ.जेधे यांनी सांगितले.

बारामतीतील दोन ‘देवदुतांचा’ मुंबईत सन्मान ! डॉ सदानंद काळे, भास्कर जेधे यांचा सन्मान

हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून माझ्या समवेत दिवसरात्र काम करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे.असे डॉ. काळे आणि डॉ.जेधे यांनी सांगितले.

बारामती वार्तापत्र

बारामती येथील बारामती हॉस्पिटलचे डॉक्टर सदानंद काळे आणि डॉ भास्कर जेधे यांचा करोना काळात झोकून देत रुग्णसेवा केल्याबद्दल यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला .
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले , आरोग्य मंत्री महाराष्ट्र राजेश टोपे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते “सन्मान देवदूतांचा” पुरस्कार देण्यात आला . ह्या पुरस्काराच्या निमित्ताने डॉक्टर सदानंद काळे व डॉ भास्कर जेधे , यांच्या कार्याची राज्यपातळीवर दखल घेण्यात आली.

बारामती येथील सिल्वर ज्युबली शासकीय रुग्णालयाचे प्रमुख डॉ.सदानंद काळे यांनी गेल्या दीड वर्षांपासूनच्या कोरोना काळात स्वतःला झोकून देऊन इतरांचे आरोग्य सुरक्षित राहणायसाठी काम केले.स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असताना देखील त्यांनी आपले कर्तव्य निस्वार्थी आणि प्रामाणिक पणे बजावत कोरोना रुग्णांची सेवा केली.बारामतीतील सिल्वर ज्युबली शासकीय रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असणाऱ्या रुग्नांच्या थेट जवळ जाऊन त्यांना आपुलकीने बोलून या संकट काळात आपल्या कर्तव्याबरोबरच त्यांना धीर देण्याचा त्यांना प्रयत्न केला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित वेळोवेळी होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत देखील डॉ.काळे यांनी कोरोना रोखण्यासाठी यशस्वीपणे राबविलेल्या उपाययोजनांची माहिती देत आणखी कोरोना कसा नियंत्रित येईल यासाठी पाऊले उचलली.कोरोना काळातील डॉ.काळे यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. दरम्यान हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून माझ्या समवेत दिवसरात्र काम करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे.असे डॉ.काळे यांनी सांगितले.

डॉ. जेधे हे बालरोगतज्ज्ञ असल्याने खरं तर ते यापासून सहज दूर राहू शकत होते …कोविड रुग्णास उपचार व मदत हे त्यांनी उस्फूर्त पणे केलेलं कार्य आहे . ज्ञान , अनुभव व अभ्यासाच्या जोरावर वेळोवेळी प्रशासनास योग्य मार्गदर्शन दिले . सेंटर मध्ये जाऊन रुग्णांना धीर दिला . उपचारांना दिशा दिली .रुग्णांच्या नातेवाईक ना धीरच दिला तर समुपदेशन ही केले . २४-२४ तास काम त्या ताणाच्या काळात केले . ह्या कामाची राज्यपातळीवर दखल घेतली गेली . बारामतीत कोविड चा बराचसा ताण कमी करण्यात मोठा वाटा डॉ. जेधे यांनी उस्फुर्त पणे उचलला.दरम्यान हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून माझ्या समवेत दिवसरात्र काम करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे.असे डॉ. जेधे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button