कोरोना काळात इंदापूर तालुक्यातील पोलीस पाटलांची कामगिरी उल्लेखनीय-मेटकरी
पोलीस पाटलांच्या कामाचे केले तोंडभरून कौतुक
कोरोना काळात इंदापूर तालुक्यातील पोलीस पाटलांची कामगिरी उल्लेखनीय-मेटकरी
पोलीस पाटलांच्या कामाचे केले तोंडभरून कौतुक
इंदापूर-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
दि. १७ रोजी तहसील कार्यालय इंदापूर येथील सभागृहामध्ये ६३ वा पोलीस पाटील दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना इंदापूरच्या तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी कोरोना काळात इंदापूर तालुक्यातील पोलीस पाटलांचे काम उल्लेखनीय आहे असे गौरवोद्गार काढले.
पुढे त्या म्हणाल्या की कोविड-19 सारख्या महामारीशी प्रशासकीय पातळीवरून लढा देत असताना तालुक्यातील सर्वच पोलीस पाटलांची खूप मदत झाली. प्रत्येक गावातील अद्यावत माहिती तात्काळ प्राप्त होत असल्यामुळे आपण कोरोना सारख्या महामारीचा प्रसार रोखण्यात बहुतांशी यश मिळवले असल्याचे म्हणत पोलीस पाटलांच्या उल्लेखनीय कामगिरीचे तहसिलदार मेटकरी यांनी मुक्तकंठाने कौतुक केले.तसेच त्याठिकाणी मार्गदर्शन करत असताना इंदापूर तहसिलचे निवासी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी ग्रामपंचायत निवडणुका आचारसंहिता व पोलीस पाटील त्यांची कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केले.इंदापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटलांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा गौरव केला. व ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पोलीस पाटलांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रदीप पोळ पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन सुनील राऊत पाटील यांनी केले आभार प्रदर्शन किरण खंडागळे पाटील यांनी केले. हा पोलीस पाटील दिनाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनिल भांगे पाटील, अरुण कांबळे पाटील, विजयकुमार करे पाटील यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.