स्थानिक

कोरोना काळात ही शेतकऱ्याने केला घोड्याचा वाढदिवस साजरा….

मुक्या जनावरांना सुद्धा कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रेम द्या..

कोरोना काळात ही शेतकऱ्याने केला घोड्याचा वाढदिवस साजरा….

मुक्या जनावरांना सुद्धा कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रेम द्या..

बारामती:वार्तापत्र

पार्श्वभूमीवर शेतकरी अडचणीत असताना सुद्धा आपल्या लाडक्या घोड्याचा वाढदिवस साजरा करून ऋण व्यक्त केले आहे.घाडगेवाडी मधील शेतकरी निखिल तुकाराम शिंदे यांचा ‘प्रताप ‘ नावाचा घोडा याचा दरवर्षी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत असतात परंतु या वर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीत असताना सुद्धा केक कापून , 1 किलो हरभरा,इतर कडधान्य ,गोळी पेंड आदी खाद्य देऊन वाढदिवस साजरा केला करून घोड्या बदल प्रेम व्यक्त करून मुक्या जनावरा ना सुद्धा भावना असतात त्यांच्यावर माणसा सारखे प्रेम करा असा संदेश दिला.
   रोजच्या आहारा पेक्षा वेगळा आहार देण्यात आला.
निखिल शिंदे सदर घोडा विवाह समारंभ,मिरवणूक आदी ठिकाणी सुद्धा वापरतात हा घोडा मारवाडी (नर) जातीचा असून ही जात मूळ राजस्थान मधील असून भारतातील सर्वोच्च अश्वाची जात आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरी या मारवाडी घोड्याची पैदास ह्व्यावी म्हणून शिंदे यांनी हा घोडा पैदाशीसाठी उपलब्ध ठेवला आहे. पुणे सातारा सोलापूर नगर ह्या जिल्ह्यातून प्रतापला पैदाशीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते .
वाढदिवस साजरा करताना या प्रसंगी संभाजी ब्रिगेड बारामती तालुका उपाध्यक्ष तुषार तुपे नवनाथ मासाळ संभाजी घाडगे डॉ विजय वाघमोडे गोरख काकडे प्रशांत काकडे रवींद्र इंगळे अजित चव्हाण निखिल चव्हाण अभिजित बळीप विशाल भगत महेश तुपे मनोज काकडे संकेत भांडवलकर यशराज घाडगे अमित चव्हाण लाला शिंदे सौरभ शिंदे शेखर शिंदे ओम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button