दिनांक 27 रोजी बारामतीमध्ये 18 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 632 वर गेली आहे.

दिनांक 27 रोजी बारामतीमध्ये 18 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 632 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
RT-PCR
बारामती मध्ये एकूण 93 नमुने RT-PCR तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 89 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बारामती शहरातील 2 व ग्रामीण भागातील एक असे तीन व इंदापूर तालुक्यातील एक असे चार रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
एंटीजेन
बारामती मध्ये आज ग्रामीण रुग्णालय रूई येथे एंटीजेन तपासणीसाठी 45 नमुने घेण्यात आले होते त्यापैकी बारामती शहरातील चार व ग्रामीण भागातील एक असे पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
खाजगी प्रयोगशाळेमध्ये
बारामतीतील खाजगी प्रयोगशाळेमध्ये एकूण 42 जणांचे नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी शहरातील सहा व ग्रामीण भागातील चार असे दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे आज दिवसभरात बारामतीमध्ये तीन rt-pcr व पाच शासकीय एंटीजेन व 10 खाजगी एंटीजेन असे एकूण अठरा रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये तांबे नगर येथील एक रुग्ण, रुई येथील एक रुग्ण, संघवी नगर येथील एक रुग्ण, निंबुत येथील एक रुग्ण, बारामती शहरातील एक रुग्ण, इंदापूर रोड अमराई येथील एक रुग्ण, अंबिका नगर येथील एक रुग्ण, कोष्टी गल्ली येथील एक रुग्ण, कसबा श्रीराम नगर येथील तीन रुग्ण तसेच बोरावके वस्ती व बारामती शहरातील एक एक रुग्ण,पाहुणे वाडीतील एक रुग्ण,पांढर वस्ती चोपडज येथील एक रुग्ण, उंडवडी क प येथील एक रुग्ण,अंजनगाव येथील एक रुग्ण आणि लोणी भापकर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ मनोज खोमणे यांनी दिली.