कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी केले आवाहन
राज्यमंत्र्यांनी तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी केले आवाहन
राज्यमंत्र्यांनी तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यात दिवसेंदिवस झपाट्याने कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये इंदापूर तालुक्यातील विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आज दि.४ रोजी इंदापूर शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक संपन्न झाली.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांकडून कोरोना परिस्थिती बद्दल आढावा घेत या संदर्भात अधिकाऱ्यांना शासनाने घालून दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी बोलताना राज्यमंत्र्यांनी इंदापूर शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करत कोविड – १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन इंदापूर तालुक्यातील ज्या ठिकाणी लसीकरणाची केंद्र आहेत त्या ठिकाणी जाऊन लस टोचून घेण्यास सांगितले.
इंदापूर तालुक्यात आत्तापर्यंत २५ हजारांच्या वरती लसीकरण झाले असून शासकीय नियमानुसार लसीकरण घेण्यास जे पात्र आहेत त्या उर्वरित सर्वांनी ताबडतोब लसीकरण करून घेण्याचे आवाहन राज्यमंत्री भरणेंनी यावेळी केले.
इंदापूर तालुक्यात सध्या ६२९ कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण असून आजची कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पहाता येणाऱ्या पंधरा दिवसात तालुक्यात बेड कमी पडण्याची शक्यता असून नागरिकांनी गांभीर्याने घेऊन सद्य परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून काळजी घेण्याच्या सूचना उपस्थित विविध प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राज्यमंत्र्यांकडून करण्यात आल्या.