कोरोना प्रतिबंधित ठिकाणी लावलेले बॅरिकेट्स होतायेत गायब; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोरोनाचा धोका वाढला
नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण.

कोरोना प्रतिबंधित ठिकाणी लावलेले बॅरिकेट्स होतायेत गायब
बॅरिकेट्स बाबत प्रशासन गंभीर नाही
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली असताना कोरोना प्रतिबंधित ठिकाणी पूर्वीच्या तुलनेत या क्षेत्राचा आकार एकदम लहान करण्यात आला असला तरी अशा भागातून अनेक व्यक्ती लावलेले बॅरिकेट्स काढून टाकून रात्री आणि दुपारच्या सुमारास बाहेर पडत असल्याचे दिसून आले. अनेक नागरिक प्रंतिबंधित क्षेत्रातून वाहनाचा वापर करून बाजारात शिरतात.यामुळे कोरोनाचा प्रसार थांबण्याऐवजी वाढण्याचा धोका वाढला आहे.
बारामतीमध्ये कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून यावर मात करण्यासाठी ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडतात त्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र तयार केले जाते व प्रतिबंधित क्षेत्रातून कुणीही बाहेर पडणार नाही आणि कुणीही आत येणार नाही, याची काळजी घेतली जाते. मात्र बॅरिकेटींग केल्यानंतरही या क्षेत्रात बिनधास्त प्रवेश मिळत आहे. तसेच या परिसरातून अनेक नागरिक निवांतपणे बाहेर पडताना दिसून येत आहे.त्यामुळे
नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.