कोरोंना विशेष

कोरोना प्रतिबांधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला ३ कोटी लस मात्रांचा टप्पा

एकाच दिवसात ४ लाख ८० हजार ९५४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

कोरोना प्रतिबांधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला ३ कोटी लस मात्रांचा टप्पा

एकाच दिवसात ४ लाख ८० हजार ९५४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

मुंबई, :बारामती वार्तापत्र रिपोर्ट

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ३ कोटींहून अधिक डोस देणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. आज सायंकाळी सातपर्यंत सुमारे ४ लाख ८० हजार नागरिकांना लस देण्यात आली. आज दुपारी दोनच्या सुमारास ३ कोटी डोसेसचा टप्पा ओलांडून महाराष्ट्र पुन्हा एकदा देशात अग्रेसर राहिले आहे.

लसीकरणात महाराष्ट्र पहिल्यापासून अग्रस्थानी आहे. आज झालेल्या लसीकरणामुळे सायंकाळी सात पर्यंत ३ कोटी २ लाख ७१ हजार ६०६ लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. एकाच दिवसात ४ लाख ८० हजार ९५४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. सायंकाळी सातपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

Back to top button