अनेकान्त स्कूलमध्ये ‘मराठी भाषा दिन’ उत्साहात साजरा
विचारांमधून संस्कार आणि भाषेचे सौंदर्य विद्यार्थ्यांना अनुभवायला

अनेकान्त स्कूलमध्ये ‘मराठी भाषा दिन’ उत्साहात साजरा
विचारांमधून संस्कार आणि भाषेचे सौंदर्य विद्यार्थ्यांना अनुभवायला
बारामती वार्तापत्र
अनेकान्त इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ मोठ्या
उत्साहात साजरा करण्यात आला.
या विशेष प्रसंगी विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी आणि महत्त्व पटवून देण्यासाठी आजी-आजोबांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे मनोगत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली . प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या आजी आजोबांचा पुस्तकभेट व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. त्यांनी आपल्या अनुभवांचे कथन करताना मराठीतील बालगीते, कथा, मराठी भाषेची थोरवी, आपले अनुभव सांगून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
त्यांच्या विचारांमधून संस्कार आणि भाषेचे सौंदर्य विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाले. स्कूलच्या प्राचार्या यांनी आपल्या भाषणात मराठी भाषा दिनाचे महत्त्व पटवून दिले. नवीन पिढीने मराठीची गोडी जोपासली पाहिजे,असे मत त्यांनी व्यक्त केले.
उपस्थित पालक आणि आजी आजोबा यांनी हा कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.