कोरोना बारामती मध्ये पुन्हा आला सावधान.
आय टी अभियंत्यास कोरोनाची लागण.
बारामती:वार्तापत्र सावधान बारामती मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे .
अरबन ग्राम परिसरातील एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले.
कोरोनामुक्त बारामती असलेल्या शहरात आज पुन्हा रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण आहे.
आयटी अभियंता असलेला बावीस वर्षांचा युवक 22 जून रोजी काही कामानिमित्त पुण्याला गेला होता.
तो परतल्यानंतर काही दिवस त्याला कसलीच लक्षणे नव्हती मात्र, दोन तीन दिवसांपासून त्याला सर्दी खोकला असा त्रास सुरु झाल्यानंतर त्याने स्वताः रुई येथे जाऊन तपासणी केली.
त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान त्याच्या जवळच्या व संपर्कात आलेल्या लोकांच्या घशातील द्रावांचे नमुने घेतले जाणार असल्याचे डॉ.सदानंद काळे यांनी सांगितले.
बारामती शहर कोरोनामुक्त झालेले होते मात्र प्रवासामुळे विशेषतः पुणे व मुंबईला प्रवास करुन आल्यानंतर कोरोनाचे निदान होत असल्याचे गेल्या काही रुग्णांच्या तपासणीनंतर निष्पन्न होत आहे.
त्या मुळे बारामतीकरांनी अनावश्यक प्रवास टाळावा, गरज असेल तरच घराबाहेर पडावे, गर्दीची ठिकाणे टाळावी, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.