कोरोना संकटापायी बंद असलेले कॉलेज 20 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू 

 विद्यार्थ्यांमध्ये 6 फुटांचे अंतर, सरकारची नियमावली काय ?

कोरोना संकटापायी बंद असलेले कॉलेज 20 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू

 विद्यार्थ्यांमध्ये 6 फुटांचे अंतर, सरकारची नियमावली काय ?

मुंबई : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून कोरोना संकटापायी बंद असलेले कॉलेज येत्या 20 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. कॉलेजमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक करण्यात आलं आहे. सर्व विद्यालयांनी कॉलेजेस सुरु करण्यासाठीची प्राथमिक तयारी केली आहे. त्यासाठीची नियमावली राज्य सरकारने जाहीर केली आहे.

विद्यापीठ, महाविद्यालये सुरु करण्यासाठीची नियमावली

♦ विद्यापीठ, महाविद्यालये वर्ग 50% पेक्षा अधिक सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला देण्यात आले आहेत.

♦ महाविद्यालयातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे बांधनकार आहे.

♦ मास्क घालणे तसेच स्वच्छतेचे शक्य ते सर्व उपाय करणे गरजेचे.

♦ कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या आकर्यक्रमांची एक ठराविक वेळ असावी.

♦ कन्टेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांना महाविद्यालयात येण्यास बंदी.

♦ फक्त लक्षणे नसलेल्या कर्मचारी, विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल.

♦ कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी लसीकरण केलेले असणे गरजेचे.

♦ लसीकरण पूर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लालेसची सोय असेल.

♦ महाविद्यालय, विद्यापीठातील दुकाने, कॅन्टीन, स्टॉल बंद असतील.

♦ विद्यार्थी, कर्मचाऱ्यांनी मास्क लावणे बंधनकारक आहे.

♦ एक बेन्च रिकामा ठेवून विद्यार्थ्यांना बसवलं जाईल.

♦ लेक्चरदरम्यान प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सहा ते आठ फुटांचे अंतर असणे गरजेचे.

महाविद्यालयांनी कॅम्प घेत लसीकरण करता येईल

या नियमावलीव्यतिरिक्त कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महाविद्यालय सुरू ठेवायची का हा निर्णय सर्वस्वी स्थानिक प्राधिकरणाला असेल. दोन्ही डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयांनी कॅम्प घेत लसीकरण करता येईल. याविषयी 13 ऑक्टोबर रोजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली होती.

Back to top button