स्थानिक

लोकशाही दिनात सहभागी होवून प्रशासनाच्यामदतीने प्रश्न निकाली काढून घ्यावेत-उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर

नागरिकांकडून एकूण ३३ अर्ज स्विकारण्यात आले

लोकशाही दिनात सहभागी होवून प्रशासनाच्यामदतीने प्रश्न निकाली काढून घ्यावेत-उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर

नागरिकांकडून एकूण ३३ अर्ज स्विकारण्यात आले

बारामती वार्तापत्र

नागरिकांचे प्रश्न तालुकास्तरावर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून अधिकाधिक नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, आपल्या अडीअडचणी, प्रश्न प्रशासनाच्या मदतीने निकाली काढून घ्यावेत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे.

मोरगाव येथे आयोजित लोकशाही दिनात नागरिकांकडून एकूण ३३ अर्ज स्विकारण्यात आले आहेत, या अर्जावर संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करुन ते वेळेत निकाली काढावेत, असे निर्देशही श्री. नावडकर यांनी दिले.

यावेळी तहसीलदार गणेश शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button