कोल्हापूरच्या चंदगड पंचायत समिती निवडणुकीत शरद पवार आणि अजितदादा गट एकत्र लढणार, बारामतीमध्ये काय होणार?
युती होणार का?

कोल्हापूरच्या चंदगड पंचायत समिती निवडणुकीत शरद पवार आणि अजितदादा गट एकत्र लढणार, बारामतीमध्ये काय होणार?
युती होणार का?
बारामती वार्तापत्र
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकींची घोषणा करण्यात आली आहे. सर्वच पक्षांनी आता निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
बारामती मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत युती होणार का याबाबत विचारले असता थोडं थांबा असे उत्तर दिले.त्यामुळे बारामतीत शरद पवार व अजित पवार युती होणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
महायुती काही ठिकाणी युतीमध्ये ही निवडणूक लढवणार आहे, तर काही ठिकाणी तीनही घटक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता एक नव राजकीय समिकरण समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती, या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत युतीची तयारी दर्शवण्यात आली होती, त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट, हा राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत देखील युती करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अखेर आता या प्रश्नाच उत्तर मिळालं आहे.
कोल्हापूरच्या चंदगड नगर पंचायतीसाठी एक नवं समिकरण समोर येत आहे, चंदगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती झाली आहे, माजी आमदार राजेश पाटील, आणि नंदाताई बाभुळकर एकत्र निवडणूक लढवणार आहेत, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने एकत्र निवडणूक लढवण्यात येणार आहे. चंदगडमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे आता या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे, दरम्यन जशी चंदगडमध्ये युती झाली तशी राज्यात अजूनही काही ठिकाणी युती होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान दुसरीकडे रविवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिथे ओबीसीसाठी जागा आरक्षित आहेत, तिथे जे मूळ ओबीसी आहेत त्यांनाच संधी द्या, जिथे ओबीसी उमेदवार मिळणार नाहीत, तिथे ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, त्यांना उमेदवारी द्या, अशा सूचना शरद पवार यांनी या बैठकीमध्ये खासदार, आमदार यांना दिल्याची माहिती समोर येत आहे.






