
मेडद स्मशानभूमीचे काम तातडीने सुरू करा..
अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा…
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील मेडद येथील मंजूर स्मशानभूमीचे काम तातडीने सुरू न केल्यास उपविभागीय पोलिस कार्यालया समोर आमरण उपोषणाचा इशारा भिम योध्दाचे संस्थापक सिताराम कांबळे यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे.
मेडद ता.बारामती येथील सार्वजनिक स्मशानभूमी दोन वर्षांपूर्वी क-हा नदीच्या पुरात वाहून गेली आहे. तेव्हा पासून उघड्यावर अंतिम संस्कार करावे लागतात. सदर स्मशानभूमीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे सहा लाख रुपये मंजूर आहेत. मात्र प्रशासनाने अद्याप ही या कामाची ई-निविदा काढली नाही. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हे काम रखडलं आहे.
येत्या दहा दिवसांत ई-निविदा काढून स्मशानभूमीचे काम तातडीने सुरू न केल्यास उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे