कोविड काळातील घरपट्टी,पाणीपट्टी माफ करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांना दिले निवेदन
कोविड काळातील घरपट्टी,पाणीपट्टी माफ करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांना दिले निवेदन
इंदापूर : प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जग हे होरपळून निघालेले आहे.अशा परिस्थितीत अनेक लोक बेरोजगार झालेले आहेत.त्यामुळे कोरोना काळातील सन २०१९ ते २०२१ मधील घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली असून या संदर्भातील मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांना बुधवारी ( दि.२० ) देण्यात आले.
कोरोना महामारीमुळे सामान्य नागरिकांना जीवन जगणे जिकिरीचे झाले आहे.अनेक लोकांना या काळात नोकऱ्या गमवाव्या लागल्याने ते बेरोजगार झालेले आहेत.त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी तालिबानी पद्धतीने सुरू केलेली कर वसुली थांबवून सद्यस्थितीचा गांभीर्यपूर्वक विचार करून लोकांची कागदपत्रांसाठी अडवणूक न करता सर्व कर माफ करून नागरिकांना सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड.बापूसाहेब साबळे, पुणे जिल्हा सचिव हनुमंत कांबळे, पुणे जिल्हा सल्लागार सागर लोंढे, इंदापूर तालुका उपाध्यक्ष हनुमंत बनसोडे, बोधिराज चव्हाण, तालुका संघटक पंकज बनसोडे, शहराध्यक्ष अविनाश मखरे, तालुका कोषाध्यक्ष राजेंद्र बंडगर, भाऊसो शिंदे, राहुल सोनवणे,सिद्धार्थ साळवे, पवन पवार, प्रसाद लोखंडे, विकास गायकवाड, माऊली मोहिते, सचिन कोकाटे, प्रमोद चव्हाण इत्यादी उपस्थित होते.