कोविड-१९ काळात आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्यमंत्री भरणेंची घेतली भेट
आरोग्य विभागात रिक्त पदी नेमणूक करण्याची केली मागणी
कोविड-१९ काळात आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्यमंत्री भरणेंची घेतली भेट
आरोग्य विभागात रिक्त पदी नेमणूक करण्याची केली मागणी
इंदापूर:सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
कोरोना काळात आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती संपुष्टात येत असून कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याकारणाने सदरील कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदी कायमस्वरूपी नेमणूक करून रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी या मागणीसह अन्य मागण्यांच्या संदर्भात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची आज (दि.२७) रोजी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.
कोरोनाच्या संसर्गजन्य जागतिक महामारीत भारतात विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासनासह आरोग्य विभागावर प्रचंड प्रमाणात ताण वाढला होता.अशा परिस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद पुणे कडून कंत्राटी तात्पुरत्या स्वरूपात भरती करून घेतले.सर्व कर्मचाऱ्यांनी जीवाची तमा न बाळगता कोविड-१९ रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर होऊन कार्य केले. कठीण काळात कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात करोना लसीकरणासाठी प्रशिक्षण देऊन आम्हाला संधी द्यावी.अशी मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच कोरोना काळातील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घ्यावे, अंशकालीन कर्मचारी घोषित करून शासनाच्या विविध विभागातील जागा कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून किमान ९० दिवस काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र वापर बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी ५०% आरोग्यसेवेत यामध्ये केला जातो. त्याप्रमाणे कोविड-१९ नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ज्यांनी आरोग्य कर्मचारी म्हणून कमीत कमी नव्वद दिवस काम केले असेल अशांना आरोग्य विभागातील सर्व पदांसाठी ५० टक्के आरक्षण दिले पाहिजे.अशा विविध मागण्या निवेदनात नमूद केल्या असून सदरील निवेदन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आले.