कोविशील्ड कोरोना प्रतिबंधक लसीच्या डोसमधील अंतर वाढवल्यामुळे नेमका ? काय फायदा होणार ? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
12 आठवड्यानंतर डोस दिला तर परिणामकता 82 टक्क्यांवर

कोविशील्ड कोरोना प्रतिबंधक लसीच्या डोसमधील अंतर वाढवल्यामुळे नेमका ? काय फायदा होणार ? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
12 आठवड्यानंतर डोस दिला तर परिणामकता 82 टक्क्यांवर
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
भारत सरकारने कोविशील्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर कोविशील्ड कोरोना प्रतिबंधक लसीच्या डोसमधील अंतर वाढवल्यामुळे नेमका काय परिणाम होतो, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यामुळे सरकारने कोविशील्ड लसीच्या डोसमध्ये अंतर वाढण्यामागचं नेमकं कारण काय आहे ? हे समजून घेऊया.
भारत सरकारने कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 6-8 आठवड्यावरुन 12 से 16 आठवडे केले आहे. एखाद्या व्यक्तीला सहा आठवड्यानंतर कोविशील्ड लसीचा दुसरा डोस दिला तर त्याची इफिकेसी (Efficacy) ही 55.1 टक्क्यांपर्यंत असते. तर हाच डोस सहा आठवड्यांवरुन बारा आठवड्यावर नेला तर त्याची इफिकेसी ही तब्बल 80.3 टक्क्यांपर्यंत वाढते. म्हणजेच बारा आठवड्यानंतर जर का कोविशील्ड लसीचा डोस दिला तर त्याची परिणामकता ही तब्बल 25 टक्क्यांनी वाढते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास लसीचा डोस बारा आठवड्याच्या नंतर घेतला तर आपल्या शरीरातील सुरक्षा कवच 25 टक्क्यांनी वाढते.
अँटिबॉडीमध्ये दुपटीने वाढ
तसेच 55 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या एखाद्या क्यक्तीला 6 आठवड्यांऐवजी 12 आठवड्यानंतर दुसरा डोस दिला तर अँटीबॉडीमध्ये दुपटीने वाढ होऊ शकते. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास शरीरातील कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या यंत्रणेत तब्बल दुपटीने वाढ होऊ शकते.
12 आठवड्यानंतर डोस दिला तर परिणामकता 82 टक्क्यांवर
लसीच्या डोसमधील कालावधीसंदर्भात ऑक्सफर्ड विद्यापीठाने माहिती दिली. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार सहा आठवड्याच्या आधी दुसरा डोस दिल्यानंतर लसीची परिणामकता 54.9 टक्के आहे. तर हाच डोस 12 किंवा त्यापेक्षा जास्त आठवड्याच्या अंतराने दिला तर त्याची परिणामकता 82.4 टक्क्यांवर पोहोचेल. हे सारे निरीक्षण नोंदवून लसीच्या डोसमधील अंतर वाढण्याची शिफारस ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेली आहे.
17 हजार लोकांवर चाचणी
कोविशील्डच्या परिणामकतेवर अभ्यास करण्यासाठी एकूण 17 हजार लोकांवर चाचणी करण्यात आली. या अभ्यासातील प्रमुख गोष्टी मेडिकल जर्नल लॅन्सेटमध्ये 6 मे रोजी प्रसिद्ध केले होते. यामध्ये दोन डोसमधील अंतर वाढवले तर लसीची परिणामकारता जास्त वाढते, असे यामध्ये सांगण्यात आले होते.
मृत्यूचा धोका कमी होतो
लसीच्या डोससंदर्भात पब्लिक हेल्थ इंग्लंड यांनीसुद्धा अभ्यास केला. त्यांनी सांगितल्यानुसार कोविशील्ड लसीचा एक डोस घेतल्यानंतर लस न घेतलेल्या माणसाच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण 80 टक्क्यांनी कमी होते. दरम्यान, याच कारणांमुळे भारतात नॅशनल वर्किंग ग्रुपने दिलेल्या सल्ल्यानुसार तसेच तांत्रिक अभ्यास करुन कोविशील्ड लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे