कोवीड हेल्पसेंटर व्हाटसअप ग्रुप ठरतोय आरोग्यदूतआरोग्यमंत्री टोपे साहेबांसह आमदार खासदारांनी घेतली दखल व केले कौतुक
सुरुवातीला एकमेकांची ओळख नसणारे एकत्रित येऊन मदतकार्य उभे राहिले.
कोवीड हेल्पसेंटर व्हाटसअप ग्रुप ठरतोय आरोग्यदूतआरोग्यमंत्री टोपे साहेबांसह आमदार खासदारांनी घेतली दखल व केले कौतुक
सुरुवातीला एकमेकांची ओळख नसणारे एकत्रित येऊन मदतकार्य उभे राहिले
यवत:बारामती वार्तापत्र
कोरोना महामारीने जगाला त्रस्त केले आणि कोरोना विरोधात लढा सुरू झाला. जो तो आपआपल्या परीने त्याविरोधात उभा राहु लागला. तर काहींनी सोशल मिडीयाचा आधार घेऊन एक चळवळ उभी केली. अशीच चळवळ ‘कोवीड हेल्पसेंटर’ व्हाट्सप ग्रुपच्या माध्यमातून अनेक सद्स्य एकत्र येत चालु झाली. या ग्रुपच्या माध्यमातून गेली २ महिनेपासुन व्हाटसअप वर रुग्णांना मदत होत आहे. यामधे प्रामुख्याने रेमेडीसिवर इंजेक्शन, बेड, रक्त व प्लाझमा उपलब्ध करुन देणे व समुपदेशन असे कार्य केले जात आहे.
गेल्या महिन्याभरात जबरदस्त मदतकार्य ग्रुपच्या माध्यमातून झाले आहे. आत्तापर्यत ३००+ प्लाझमा,१२०+ रेमेडीसिवर,२५+ बेड, २५+ रक्त उपलब्धता करुन देण्यात आले. याची दखल तालुकाच नव्हे तर राज्य पातळीवरून घेतली गेली. आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांनी सन्मानपत्र देऊन या कोरोना योध्यांचा सन्मान केला.
मा.ना.राजेशजी टोपे साहेब (आरोग्यमंत्री महाराष्ट्र शासन), राज्यमंत्री दत्तामामा भरणे साहेब, खासदार हेमंतआप्पा गोडसे नाशिक, खासदार डॉ.अमोलजी कोल्हे, खासदार सौ.सुप्रियाताई सुळे, आमदार अॕड.राहुलदादा कुल दौंड, आमदार श्री.अतुलदादा बेनके जुन्नर, आमदार दत्तात्रय सावंत पंढरपूर, मा.राजेंद्रजी कोंढरे साहेब मुख्य समन्वयक मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य/ राष्ट्रीय सरचिटणीस मराठा महासंघ यांनी शुभेच्छा पत्र पाठवून ग्रुपचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
प्रामुख्याने दौंडचे आमदार अॕड.राहुलदादा कुल यांनी तर निवासस्थानी सर्व टिम ला बोलावून कार्याचे कौतुक करुन शुभेच्छापत्र दिले व काही मदत लागल्यास आवर्जून सांगा असे सांगितले. तसेच मराठा महासंघ दौंड तालुका, पोलिस फ्रेन्डस वेलफेअर असोसिएशन दौंड तालुका, मावळा संघटना दौंड तालुका, शिवसेना वैद्यकीय मदतकक्ष मुंबई, अनंतशांती सामाजिक संस्था कोल्हापूर यांनी सन्मानपत्र देवून सन्मानित केले.
यामध्ये प्रामुख्याने हर्षल भटेवरा (राहू), मयुरआबा सोळसकर (कासुर्डी), सुरज चोरघे यवत, धनराज मासाळ (केडगाव), जयेश ओसवाल, कल्पनाताई काटकर बारामती, नितिन हेंद्रे यवत, प्रकाश वरुडकर यवत, दिनेश गडधे उंडवडी, सचिन गुंड उंडवडी, प्रमोद उबाळे यवत, स्वप्निल घोगरे कानगाव, समीर पठाण नानगाव,प्रसाद मुनोत दौंड, रमेश राठोड दौंड, सौरभ भंडारी दौंड, रोहन सपकाळ लोणी काळभोर, निलेश कुंभार चौफुला, सुरज नेटके हडपसर, सुहास लोंढे पुणे, निशांत ढोले भोसरी, रोहन होले वानवडी, हरि रोडे चाकण, शिवम घोलप जुन्नर, सचिन तोडकर मंचर आदि सदस्य जोमाने कार्य करतात.
व्हाटसअप ग्रुपवर आलेल्या मेसेजवर खात्री करुन कार्य केले जाते.सुरुवातीला एकमेकांची ओळख नसणारे एकत्रित येऊन मदतकार्य उभे राहिले. यामध्ये सामाजिक, राजकीय, डॉक्टर, पत्रकार, वकील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचेही व पुणे जिल्हा मधील ईतर रुग्णदूतांचेही सहकार्य लाभत आहे.व हे कार्ये कोवीड काळ संपला तरी येणाऱ्या कोणत्याही संकटात देशसेवेसाठी चालूच राहणार असे ग्रुप सदस्यांचे मत आहे.