कोरोंना विशेष

कोवॅक्सिन (COVAXIN) ला DCGI कडून मंजुरी मिळण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता

कोवॅक्सीनच्या डेटाचे मूल्यांकन केले जात असल्याने लसीला DCGI कडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा करावी लागू शकते.

कोवॅक्सिन (COVAXIN) ला DCGI कडून मंजुरी मिळण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता

कोवॅक्सिन (COVAXIN) ला DCGI कडून मंजुरी मिळण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता

प्रतिनिधी

लहान मुलांसाठी भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोरोना लस कोवॅक्सिन (COVAXIN) ला DCGI कडून मंजुरी मिळण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो. सूत्रांचे म्हणणे आहे की, कोवॅक्सीनच्या डेटाचे मूल्यांकन केले जात असल्याने लसीला DCGI कडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा करावी लागू शकते.

दरम्यान, भारत बायोटेकची लस कॅनडा आणि अमेरिकेत 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना दिली जाऊ शकते अशी बातमी देखील आहे. यासाठी भारत बायोटेकची सहयागी कंपनी ऑक्युजेन इंक.ने कॅनेडियन आणि अमेरिकेन अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. अमेरिका आणि कॅनडाने परवानगी दिल्यास भारत बायोटेकचे कोवॅक्सिन या दोन देशांमध्येही वापरण्यास सुरुवात होईल.

WHO कडून Covaxin ला मान्याता

मागच्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तांत्रिक सल्लागार टीमने (TAG) Covaxin ला आपत्कालीन वापराच्या यादीत (EUL) समाविष्ट केले होते. WHO ने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी Covaxin च्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली. WHO ची मंजुरी मिळाल्यानंतर आता ज्या लोकांना ही लस देण्यात आली आहे ते कोणत्याही निर्बंधाशिवाय परदेशात जाऊ शकतील. WHO ने आतापर्यंत 6 कोरोना प्रतिबंधक लसींना मान्यता दिली आहे.

यासोबत, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने लसीची शेल्फ लाइफ 12 महिन्यांनी वाढवली आहे. याचा अर्थ आता ही लस निर्माणकेल्याच्या तारखेपासून 12 महिन्यांपर्यंत वापरली जाऊ शकते. कंपनीने या लसीचा डेटा सीडीएससीओला पाठवला होता, त्यानंतर त्याला मान्यता देण्यात आली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button