क्रिकेटला आणखी एक मोठा धक्का ,ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू
सायमंड्सने 6 शतके आणि 30 अर्धशतके झळकावली आहेत.

क्रिकेटला आणखी एक मोठा धक्का ,ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू
सायमंड्सने 6 शतके आणि 30 अर्धशतके झळकावली आहेत.
प्रतिनिधी
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स याचं निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री टाऊन्सविले येथे झालेल्या कार अपघातात सायमंड्सचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायमंड्सला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले पण त्याला वाचवता आले नाही. या अपघातात सायमंडला गंभीर दुखापत झाल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटला हा आणखी एक मोठा धक्का आहे. मार्चमध्ये शेन वॉर्न आणि रॉड मार्श यांच्या दुःखद मृत्यूनंतर सायमंड्स हे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील तिसरे दिग्गज आहेत ज्यांचे या वर्षी अचानक निधन झाले. सायमंड्सच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करणारे ट्विट करून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू जेसन नील गिलेस्पी यांनी सायमंड्सच्या मृत्यूच्या वृत्तावर शोक व्यक्त केला. “जागे होताच ही भयानक बातमी आली,” असे ट्विट त्यांनी केले. “संपूर्णपणे उद्ध्वस्त. आम्ही सर्वजण तुझी आठवण काढणार आहोत मित्रा”, असे ते म्हणाले.
माजी सहकारी आणि फॉक्स क्रिकेट सहकारी अॅडम गिलख्रिस्टने लिहिले, “हे खरोखर दुःखद आहे.” वरिष्ठ क्रिकेट पत्रकार रॉबर्ट क्रॅडॉक यांनी दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री टाऊन्सविलेच्या बाहेर सुमारे ५० किमी अंतरावर ऑसी अष्टपैलू खेळाडूचा मृत्यू झाला. क्वीन्सलँड पोलिसांच्या निवेदनानुसार, सायमंड्स रात्री 10:30 वाजता कारने एकटे निघाले होते. त्यावेळी त्यांचा अपघात झाला.
अपघाताच्या माहितीनंतर, वैद्यकीय पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. परंतु तोपर्यंत सायमंड मृत्युमुखी पडले होते. सायमंड्स ऑस्ट्रेलियासाठी 26 कसोटी खेळले आणि 1999 ते 2007 दरम्यान जगावर वर्चस्व गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा ते अविभाज्य भाग होते. निवृत्तीनंतर खेळताना, वॉर्न आणि सायमंड्स दोघेही फॉक्स क्रिकेटच्या समालोचन संघाचे महत्त्वपूर्ण सदस्य होते.