स्थानिक

तीन महिन्यांपासून उभी असलेली लालपरी रस्त्यावर धावणार.

शासनाचे सर्व नियमांचे पालन करीत सहा मार्गांवर बससेवा सुरू.

तीन महिन्यांपासून उभी असलेली लालपरी रस्त्यावर धावणार.

बारामती: गेल्या तीन महिन्यांपासून उभी असलेली लालपरी पुन्हा रस्त्यावर धावणार असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शासनाचे सर्व नियमांचे पालन करीत सहा मार्गांवर बससेवा सुरू केली असल्याची माहिती आगारप्रमुख अनिल गोंजारी यांनी दिली.
बारामती आगारातून सोमवार (दि.15) पासून सहा मार्गांवर बससेवा सुरू केली जाणार आहे. लालपरीची चाके यामुळे फिरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हडपसर,बारामती-जेजुरी, बारामती-निरा, बारामती-भिगवण,बारामती-वालचंदनगर, बारामती-एमआयडीसी याठिकाणी या बस मर्यादित प्रवाशांना घेऊन प्रवास करणार आहेत. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून अनेकांचा कामावर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून बारामती आगाराच्या एसटी बस बंद असल्याने आगाराला करोडो रुपयांचा फटका बसला आहे. कोरोनासंबंधी सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून या बस सुरू करण्यात येणार असून प्रवाशांनीही सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अमोल गोंजारी यांनी केले आहे.

सोमवारपासून सुटणार्‍या बसचे वेळापत्रक : हडपसर – सकाळी 6,7, दुपारी 2 व 3 वाजता. जेजुरी – सकाळी 8,11, दुपारी 2 व सायंकाळी 5 वा. निरा – सकाळी 7,10, दुपारी 2व सायंकाळी 5 वा. भिगवण – सकाळी 7,9,11, दुपारी 1,2,4 व सायंकाळी 6 वाजता, वालचंदनगर – सकाळी 7,9.30, 11.30, दुपारी 4,4 व सायंकाळी 6 वाजता, एमआयडीसी – सकाळी 8,9,10,11, दुपारी 1,2,3,4 वाजता.

Back to top button