क्राईम रिपोर्ट

खळबळजनक! राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे गोळीबार प्रकरणी माळेगाव चे माजी सरपंच जयदीप तावरे यांना अटक ,राजकीय गोटात खळबळ !

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींना त्याच दिवशी अटक केली.

खळबळजनक! राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे गोळीबार प्रकरणी माळेगाव चे माजी सरपंच जयदीप तावरे यांना अटक ,राजकीय गोटात खळबळ !

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींना त्याच दिवशी अटक केली.

क्राईम : बारामती वार्तापत्र

माळेगाव – पणदरे जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहीणी तावरे यांचे पती, राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे यांच्यावर मागील महिन्यात गोळीबार झाला होता या गोळीबाराच्या गुन्हात आरोपींना चिथावणी दिल्याच्या कारणावरून बारामती तालुका पोलीसांनी माळेगावचे माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना सोमवारी रात्री अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली

31 मे रोजी रविराज तावरे पत्नीसह माळेगाव मध्ये वडापाव आणण्यासाठी गेले होते त्यावेळी आरोपींनी रविराज तावरे त्यांच्यावर गोळीबार केला होता या घटनेमुळे बारामती तालुक्यात खळबळ उडाली होती

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींना त्याच दिवशी अटक केली. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य पदाच्या माध्यमातून केलेली विकास कामे याविषयी मोरे टोळीकडून तावरे यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देण्याचा प्रकार केला जात होता त्यामुळे पोलिसांनी मोरे टोळीवर गुन्हा दाखल केला.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी रविराज तावरे यांचा या घटनेतील जबाब घेतला. या जबाबामध्ये रविराज तावरे यांनी माळेगाव चे माजी सरपंच जयदीप तावरे, तसेच माळेगावमधील बड्या उद्योजकांचेही नाव या जबाबात सांगितल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी काल रात्री माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यास ताब्यात घेतले.

मात्र आज प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली असून गोळीबार प्रकरणातील आरोपींना माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांनी चिथावणी दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर भादवि कलम 109 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी संगीत त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे

Related Articles

Back to top button