क्राईम रिपोर्ट

खळबळ; भरदिवसा शिरुरमध्ये न्यायालय परिसरात गोळीबार!, पत्नीचा मृत्यू

आरोपी तरुण हा माजी सैनिक 

खळबळ; भरदिवसा शिरुरमध्ये न्यायालय परिसरात गोळीबार!, पत्नीचा मृत्यू

आरोपी तरुण हा माजी सैनिक

क्राईम;बारामती वार्तापत्र

पुणे जिल्ह्यातल्या शिरुरमधून मोठी बातमी समोर येतेय. शिरुर इथे न्यायालयाच्या परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपली पत्नी आणि सासूवर भरदिवसा न्यायालयीन परिसरात गोळीबार केला. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर सासुची प्रकृती गंभीर आहे.

कौटुंबिक वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून सासु वरती सध्या शिरूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी सध्या शिरूर पोलिस दाखल झाले असून भरदिवसा न्यायालय परिसरात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली होती.

पत्नीचा जागीच मृत्यू – या गोळीबारात पत्नीचा जागीच मृत्यू (His Wife Died & Mother-in-Law in Critical Condition) तर सासूची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक असल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे. सासूवर शिरूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू शिरूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.

परवाना प्राप्त पिस्तूलमधून गोळीबार – सकाळी शिरूर येथे पाटबंधारे विभाग कार्यालय परिसरात दीपक पांडुरंग ढवळे (माजी सैनिक, राहणार अंबरनाथ, जिल्हा ठाणे) याने त्याच्या परवाना प्राप्त पिस्तूलमधून त्याची पत्नी मंजुळा रंगनाथ झांबरे (राहणार वाडेगव्हाण, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर ) व तिच्यासोबत असलेली तिची आई यांच्यावर गोळीबार केला. त्यांची पोटगीची केस न्यायालयात चालू होती. आरोपीसोबत त्याचा सख्खा भाऊ संदीप पांडुरंग ढवळे हा होता. दोघांना रांजणगाव व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी रिक्षा आणि शस्त्रांसह ताब्यात घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram