इंदापूर

खासदार सुप्रिया सुळे आणि राजवर्धन पाटील यांनी केली अपघातग्रस्तांना मदत

बारामती इंदापूर रोडवर झाला अपघात

खासदार सुप्रिया सुळे आणि राजवर्धन पाटील यांनी केली अपघातग्रस्तांना मदत

बारामती इंदापूर रोडवर झाला अपघात

इंदापूर : प्रतिनिधी
बारामती इंदापूर रोड वरील अंथुर्णे येथे वाहनाचा अपघात झाला असताना तेथील मार्गाने प्रवास करणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी थांबून अपघातग्रस्तांची विचारपूस करुन त्यांना मदत केली.अपघातग्रस्तांना वेळेत वैद्यकिय मदत मिळावी यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि राजवर्धन पाटील यांनी प्रयत्न केले.

राजवर्धन पाटील यांनी वाहनाची व्यवस्था केली तर सुप्रिया सुळे यांनी अधिकाऱ्यांना फोन करून अपघातग्रस्तांना ताबडतोड मदत होईल असे प्रयत्न केले.उपस्थिती नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Back to top button