पुणे

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून पुण्यात येथे 12 दिव्यांग जोडप्यांच्या अनोखा विवाह सोहळा

दिव्यांग व्यक्तींच्या विवाहांना अर्थसहाय्य योजनेसाठी राज्य सरकार सकारात्मक - धनंजय मुंडे

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून पुण्यात येथे 12 दिव्यांग जोडप्यांच्या अनोखा विवाह सोहळा 

दिव्यांग व्यक्तींच्या विवाहांना अर्थसहाय्य योजनेसाठी राज्य सरकार सकारात्मक – धनंजय मुंडे

दिव्यांगांची युडीआयडी कार्ड नोंदणी अधिक व्यापक करणार – राजेश टोपे

पुणे,प्रतिनिधी

दिव्यांग व्यक्तींचे जीवन सामान्य व्यक्तिप्रमाणे सुखकर व्हावे यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग जोडप्यांच्या लग्नासाठी त्यांना विशेष अर्थसहाय्य देणारी योजना सुरू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या 12 दिव्यांग जोडप्यांच्या विवाह सोहळ्यास श्री.मुंडे यांच्यासह आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रियाताई सुळे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

या विवाह सोहळ्यांसाठी खासदार सुळे यांनी पुढाकार घेतला होता. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच, पवार चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ संचालित दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्यावतीने या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात लग्न सोहळा अनुभूती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या खासदार सुळे यांचे यावेळी श्री. मुंडे आणि श्री. टोपे यांनी कौतुक केले.

दिव्यांग नोंदणी व युडीआयडी राज्यव्यापी मोहीम अधिक व्यापक करणार : मंत्री राजेश टोपे

दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करून त्यांना आवश्यक असलेले दिव्यांग ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) देण्यासाठी 12 डिसेंबर 2021 ते 12 मार्च 2022 या दरम्यान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

दिव्यांग व्यक्तींना राज्य व केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कार्ड असणे अनिवार्य आहे. त्यामुळे या विशेष मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त नोंदणीसाठी ही मोहीम राज्यभरात अधिक व्यापक पद्धतीने राबिविली जाईल तसेच आरोग्य विभाग यासाठी आवश्यक सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी माहिती याप्रसंगी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

श्रीमती सुळे म्हणाल्या, मंत्री श्री. मुंडे आणि आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्या सहकार्यामुळे या लग्न सोहळा उत्कृष्ट पद्धतीने होऊ शकला. यापुढे अशा प्रकारचे समाजोपयोगी कार्यक्रम राज्यभरात राबवले जाणार आहेत.

सावित्रीबाईं फुले यांना अभिवादन आणि संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन

पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील एका मंगल कार्यालयात आयोजित या सामुदायिक विवाह सोहळ्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे सामूहिक पूजन करून सर्व नवदाम्पत्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. सोहळ्यात मास्क वापरण्यासह कोविड विषयक नियमांचेही पालन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केलेले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विजय कान्हेकर, अभिजित राऊत, दिपिका शेरखाने तसेच सर्वच आयोजकांचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल सर्वांनीच कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram