खास ईद निमीत्त सातव परिवारातर्फे १,५०० कुटूंबियांना शिर्खुर्मा साहित्य व दुध वाटप…
कोरोनाच्या छायेत असल्याने हि बाब पाहुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार

खास ईद निमीत्त सातव परिवारातर्फे १,५०० कुटूंबियांना शिर्खुर्मा साहित्य व दुध वाटप…
कोरोनाच्या छायेत असल्याने हि बाब पाहुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार
बारामती वार्तापत्र
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे हाताला काम नाही. रोजचा दिवस कसा भागवायचा याची चिंता अनेक मुस्लिम कुटुंबीयांना जाणवत होती. मुस्लिम
बांधवांची रमजान ईद गोड व्हावी, यासाठी गटनेते सचिन सातव व नगरसेवक सूरज सातव, माळेगाव कारखान्याचे संचालक नितीन सातव यांच्या वतीने ईद निमित्त पंधराशे कुटुंबीयांना शिर्रखुमा साहित्य किट व दुध वाटप (दि:१२) रोजी करण्यात आले.
कोरोना प्रादुर्भाव पाहता संपुर्ण राज्यासह देशामध्ये लाॅकडाऊन सुरु असुन जवळपास सर्वच दुकाने,उद्योगधंदे,बंद असल्यामुळे मजूर,कामगार,मध्यमवर्गीय नौकरदार तसेच ७० टक्के मुस्लिम समाज हा व्यवसायात असल्याने लॉकडाऊनच्या काळात मुस्लिम बांधवांना रमजान महिन्यात फार अडचणी निर्माण झाल्या होत्या. सण वार कोरोनाच्या छायेत असल्याने हि बाब पाहुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार व आशीर्वादाने मा. नगराध्यक्ष सदाशिव बापुजी सातव यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते सचिन सातव ,नगरसेवक सुरज सातव माळेगाव कारखान्याचे संचालक नितीन सातव यांनी सलग दुसऱ्या वर्षी देखील पंधराशे कुंटबांना शिर्रखुमा साहित्य किट व दुध वाटप केले आहे.सदर किट साठी मा. ना. अजित दादा यांनी साखर दौंड शुगर मार्फत व बारामती दूध संघ मार्फत दुधाची सोय करण्यासाठी सूचना केल्या. दरम्यान यावेळी सबंध मुस्लिम बांधवांनी मा. ना. अजित दादा पवार व सातव कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले.
या प्रसंगी पत्रकार मन्सूर शेख,फिरोज सय्यद,आक्रम बागवान,फिरोज शेख,अभिजित ढवान पाटील ,अनिस मोमिन,समीर शेख उपस्थित होते.तर नगरसेविका डॉ सुहासिनी सातव , नगरसेवक संतोष जगताप , नगरसेवक गणेश सोनवणे यांनी मुस्लिम बांधवांना बरोबर घेऊन घरोघरी जाऊन साहित्य वाटपाचे नियोजन केले.