खा.शरद पवारांचा युवा खेळाडूंना कानमंत्र, विमान किँवा हेलिकॉप्टर टाळून रस्त्याने प्रवास
बारामती स्पोर्टस फाउंडेशनचे अध्यक्ष आयर्नमॅन सतीश ननवरे यांनी प्रास्ताविकात फाउंडेशनची पार्श्वभूमी सागीतली
खा.शरद पवारांचा युवा खेळाडूंना कानमंत्र, विमान किँवा हेलिकॉप्टर टाळून रस्त्याने प्रवास
बारामती स्पोर्टस फाउंडेशनचे अध्यक्ष आयर्नमॅन सतीश ननवरे यांनी प्रास्ताविकात फाउंडेशनची पार्श्वभूमी सागीतली
बारामती वार्तापत्र
दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्येकाने निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मलाही जेव्हा विविध ठिकाणी जायचे असते, तेव्हा मी विमान किंवा हेलिकॉप्टरचा वापर टाळत रस्त्याने जातो. निसर्गाच्या सहवासात तुम्ही जितके जाल, तितकी तुमची प्रगल्भता वाढेल,’ असा कानमंत्र खा.शरद पवार यांनी आज युवकांना दिला.
बारामती सायकल क्लब च्या सर्व सायकल स्वरांनी आज खासदार शरद पवार यांची गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेऊन मार्गदर्शन घेतले यावेळी त्यांनी सांगितले की मीही पुणे ते शिवनेरी सायकल सफर केली होती. असे सांगीतल्यावर युवा खेळाडूंना धक्का बसला.
तुम्ही सायकलवरून शिवनेरी दर्शन केल्याने त्या परिसराची तुम्ही पाहणी केली. निसर्गाच्या जवळ तुम्ही गेला, निसर्ग वाचनाची आवड तुम्हाला या निमित्ताने होईल. बारामतीत सायकलसह खेळाची संस्कृती रुजू पाहते, ही बाब समाधानाची आहे. विद्यार्थीदशेत मीही पुणे ते शिवनेरी सायकलवरून गेलो होतो, त्या काळात वाहनाची सोय नव्हती आणि आमच्याकडे वाहनेही नव्हती, त्यामुळे आम्ही सायकलवरून शिवनेरी वर गेल्याचे पवारसाहेबांनी सांगितल्यावर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
मीही जेव्हा प्रवासाला निघतो तेव्हा मी हवाईमार्ग टाळतो. कारण मलाही रस्त्यांची माहिती होते. लोकांशी संवाद साधता येतो. त्या परिसरात कोणती पिके घेतली जातात, शेतकऱ्यांची काय अडचण आहे, हे समजते. या निमित्ताने मला लोकांना भेटता येते, त्यांच्याशी संवाद साधता येतो.असे खा.पवार यांनी यावेळी सांगितले.
बारामती स्पोर्टस फाउंडेशनचे अध्यक्ष आयर्नमॅन सतीश ननवरे यांनी प्रास्ताविकात फाउंडेशनची पार्श्वभूमी सागीतली व बारामतीत नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे ननवरे यांनी पवारसाहेबांना या वेळी सांगितले.
पवार साहेबांच्या बारामती ते शिवनेरी प्रवासाबद्दल खेळाडूंना सांगितल्यावर खेळाडूंनाही आपण करत असलेल्या आरोग्यपूर्ण सायकलिंग साठी भविष्यात उत्साह वाढला आहे.