स्थानिक
खा.सुनेत्राताई पवार यांनी मानले डॉ .संजय ओक व त्यांचे सहकारी यांचे आभार
२५ लहान बालकांवर मोफत शस्त्रक्रिया संपन्न

खा.सुनेत्राताई पवार यांनी मानले डॉ .संजय ओक व त्यांचे सहकारी यांचे आभार
२५ लहान बालकांवर मोफत शस्त्रक्रिया संपन्न
बारामती वार्तापत्र
मुंबईतील प्रथितयश सर्जन डॉ. संजय ओक व त्यांचे सहकारी यांनी बारामतीत येऊन गरीब व गरजू कुटुंबातील २५ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया केली. सहा बालकांवर मोठ्या शस्त्रक्रिया असल्याने त्या ठाण्यात मोफत करण्यात येणार आहेत.
खा. सुनेत्राताई यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बारामतीकरांच्या वतीने आभार मानले. या उपक्रमाला आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देणाऱ्या universal sports cultural foundation च्या श्री.नवरंगे व जोगळेकर या पदाधिकाऱ्यांचे,तसेच हॉस्पिटल व अन्य सर्व मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ.मुथा यांचेही त्यांनी आभार मानले.
असे उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी केला. शस्त्रक्रिया झालेली बालके व त्यांचे पालक यांच्याही त्यांनी भेटी घेतल्या.