खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्याने बारामतीत नेमणुकीस असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू
दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त
खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्याने बारामतीत नेमणुकीस असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू
दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त
बारामती वार्तापत्र
बारामती तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोपट विष्णू दराडे ( वय ४४ ) यांचा खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू झाला असून या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
बारामती तालुका पोलीस स्टेशन येथील त्यांची 24 तासाची पोलीस ठाणे अंमलदार मदतनीस ड्युटी संपवुन घरी आले होते. जेवणखाण करुन ते दुपारी 03/00 वा. चे सुमारास झोपी गेले होते. पोपट विष्णु दराडे यांना दोन ते तीन दिवसापासुन खोकला येत असलेने ते घरातील खोकल्याचे औषध घेत होते.
खोकल्याचे औषध व शेतीसाठी आणलेले 2-4D तननाशक हे घरातील खिडकीत एकाच ठिकाणी ठेवले होते.
सायंकाळी 05/00वा.चे सुमारास त्यांना झोपेत खोकल्याची उबळ आलेने त्यांनी झोपेच्या गुंगीत नजरचुकीने खिडकीत असलेले खोकल्याचे औषध समजुन शेतीसाठी आणलेले घरातील 2-4D हे विषारी तननाशक पिले होते. त्यानंतर त्यांना त्रास होउ लागलेने त्यांना सायंकाळी- 07/00 वा.चे सुमारास औषधोपचारकामी बारामती येथील भाग्यजय हॉस्पिटल येथे मुलगा तुषार याने व इतर नातेवाईकांनी अॅडमीट केले होते.मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.