खोटे दस्तऐवज बनवून करोडोंचा गंडा घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
गुन्ह्यात आठ ते दहा लोकांची सुमारे 01 कोटी रुपयांची फसवणूक
खोटे दस्तऐवज बनवून करोडोंचा गंडा घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
गुन्ह्यात आठ ते दहा लोकांची सुमारे 01 कोटी रुपयांची फसवणूक
क्राईम रिपोर्ट बारामती वार्तापत्र
दिनांक 28/12/2020 फिर्यादी नामे अपूर्व सुभाषचंद्र नागपाल वय 49 वर्ष रा.क्लेवर हिल्स कोंढवा पुणे यांनी फिर्याद दिली की मौजे आव्हाळवडी येथील गट नं 1235 मध्ये एकूण 4 एकर क्षेत्र असून त्यामध्ये फार्महाऊस असून त्यांनी हे क्षेत्र विकत घेतले असून त्याचा सात बारा हा त्यांचे भावाच्या नावावर असून दिनांक 28/12/2020 रोजी काही लोक सदर जागेवर काही लोक जेसीबी घेऊन साफसफाई करीत असल्या बाबत माहिती मिळाल्यानंतर फिर्यादीनि त्याबाबत चौकशी केली असता सदर ची जमीन ही त्यांनी ही अपूर्व नागपाल व इतर यांचेकडून विकत घेतली असून आम्ही त्यांना बँकेच्या चेकने ईसार पावती म्हणून 1 कोटी रुपये दिले आहेत व 6.5 कोटी रुपये खरेदीखत च्या दिवशी देणार असल्याचे सांगितले वरून त्यावेळी फिर्यादी यांनी आपणच अपूर्व नागपाल असून आपली या आधी कधीच भेट झाली नसून त्यातील आरोपी यांनी खोटा दस्तऐवज व खोटे क्षेत्र मालक बनवून फसवणूक केल्याचे समजल्यानंतर लोणीकंद पो स्टे गु र नं 1104/2020 भा द वी 420,465,467,471,34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदर च्या गुन्ह्यात आठ ते दहा लोकांची सुमारे 01 कोटी रुपयांची फसवणूक झालेली असल्यामुळे व सदर गुन्हयातील आरोपीनी अजून अश्या प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता आसल्यामुळे सदर आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम समांतर तपास करीत असताना गोपनीय बतमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्हयातील आरोपी हे एक वाघोली गावामध्ये येणार असल्याची माहिती मिळेलेवरून सदर ठिकाणी छापा टाकून एकूण 4 आरोपीना सापळा रचून पकडण्यात आलेले आहे 1) भैरवनाथ बाबुराव साळुंखे वय 32 रा.धायरकर कॉलनी कोरेगाव पार्क पुणे 2) योगेंद्र रघुनाथ खिस्ते वय 38 रा.अल्फा प्रीमियर विमाननगर पुणे 3) संदीप सेवकराम बसतानी वय 38 रा.फ्लॅट नं 502,लक्ष्मी इंक्लेव लोणकर वस्ती मुंढवा4) सुदेश संभाजी राव वय 34 रा.सुदर्शननगर पिपळे गुरव यांना ताब्यात घेऊन लोणीकंद पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे .
सदरची कारवाई ही वरिष्ठ पोनि श्री. पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि रामेश्वर धोंडगे ,सफौ.दत्ता जगताप, पोहवा अनिल काळे ,पोना गुरू जाधव , अभिजित एकशिंगे,पो शि बाळासाहेब खडके ,चा पो हवा प्रमोद नवले यांनी केली आहे..