खोट्यानाट्या व फसव्या नेत्यांना तुम्ही किती दिवस बळी पडणार आहात असा सवाल राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले सध्या यांना काहीच काम नाही.

खोट्यानाट्या व फसव्या नेत्यांना तुम्ही किती दिवस बळी पडणार आहात असा सवाल राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले सध्या यांना काहीच काम नाही
इंदापूर: बारामती वार्तापत्र
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील आरोप प्रत्यारोप सातत्यानं सुरु असल्याचं पाहायला मिळतं. दत्तात्रय भरणे यांनी भूमिपूजन कार्यक्रमात पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. खोट्यानाट्या व फसव्या नेत्यांना तुम्ही किती दिवस बळी पडणार आहात असा सवाल राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थितांना केला. इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या कारखान्याचे सभासद लगेच होता येते, सर्वसामान्य लोकांनाही लगेच सभासद केले जाते, एका मिनिटात प्रोसिजर करून त्याना सभासद केले जाते, मात्र येथील नेत्यांचे कारखाने हर्षवर्धन पाटील याचे नाव न घेता भरणे म्हणाले, ” यांचे कारखाने फक्त नावालाच सहकारी आहेत, असताना ते खाजगी पेक्षा वाईट आहेत, अशी टीका भरणे यांनी केली.
सभासदत्व खुलं करा
दत्तात्रय भरणे यांनी पाटील यांना आव्हान देत, जर तुम्हाला (पाटील यांचे नाव न घेता) जनतेबद्दल एवढा विश्वास आहे, जनतेबद्दल जर तुम्हाला एवढे प्रेम आहे तर ओपन सभासदत्व करा, इंदापूर सहकारी साखर कारखाना व निरा भीमा सहकारी साखर कारखान्यांना का सभासदत्व केले जात नाही, सगळ्या बाबतीत जवळचे बघायचे असे म्हणत राज्यमंत्री भरणे यानी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या खूप समाचार घेतला. इंदापूर तालुक्यातील भीमा नदीवरील भाटनिमगांव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याचे उंबरठा पातळी वाढवण्याच्या कामाचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते..
त्यांना सध्या वेळच वेळ सध्या काहीच काम नाही
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले सध्या यांना काहीच काम नाही. त्यांना सध्या वेळच वेळ आहे.. विहिरीच्या पाणी पूजनाच्या परडीला जर यांना बोलावलं तरी ते तुमच्या आधी उपस्थित राहतील, त्यांना सध्या काही कामच राहिलेले नाही. त्यांनी वीस वर्ष जर काम केलं असतं तर तुमच्यावर ही वेळ आली नसती. शेजारील तालुके बघा आंबेगाव, बारामती, या गावांचा विकास बघा.. तुमच्याकडे वीस वर्ष मंत्रीपद होते तुम्ही एवढे वर्षे काय केल? असा सवालही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाटलांना केला.
भरणे पुढे म्हणाले, मला तुमच्यावर टीका करायची नव्हती, मात्र दोन दिवसांपूर्वी जी पत्रकार परिषद तुम्ही घेतली त्याच्यामुळे तुम्ही खूप मोठी चूक केलेली आहे.. तुम्ही निवडणुकीच्या वेळी राजकारण करावे आता तुम्ही शांत रहा असा ही सल्ला यावेळी भरणे यांनी पाटील यांना दिला.