खोर येथे अंजीर पीक शिवार फेरी व परिसंवाद संपन्न
अंजीर पीक साठी मान्यवरांचे मार्गदर्शन

खोर येथे अंजीर पीक शिवार फेरी व परिसंवाद संपन्न
अंजीर पीक साठी मान्यवरांचे मार्गदर्शन
बारामती वार्तापत्र
मंगळवार दि 16 मार्च रोजी खोर ता. दौंड याठिकाणी कृषी विज्ञन केंद्र बारामती व टेस्टी बाईट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंजीर पीक शिवार फेरी व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये दौंड, बारामती, जामखेड येथील शेतकरी सहभागी झाले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. राजेंद्र दादा पवार, चेअरमन आग्रिकलचारल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती हे होते. तसेच डॉ. विजय सुपे सहयोगी संशधन संचालक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी आँजिर लागवड व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले, शेतकरी श्री. समीर डोंबे यांनी आंजिर् प्रक्रिया व विक्रिव्यवस्थपण बाबत माहिती, दिली, डॉ. गणेश इधाते, प्रमुख अंजीर संशोधन केंद्र, जाधववाडी ता. पुरंदर यांनी आंजिर बहार व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले तसेच, डॉ. देविदास काकडे यांनी कीड रोग व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले. टेस्टी बाईट फाऊंडेशनचे डॉ. रविमोहन यांनी कंपीचे सी. एस. आर. मधून गावात सुरू असलेल्या कामांची माहिती दिली, याच का्यक्रमात महिलांना वनराज कोंडी पिल्ले, व शेतऱ्यांना भाजीपाला रोपांचे वाटप केले, श्री पवार शेतकऱ्यांना म्हणाले या गावातील शेतकरी टँकरने पाणी घालून आंजिर बागा जगवतात आशाच बागा इतर भागातील गावात ही व्हाव्यात, त्यासाठी लागणारी रोपे केव्हिके मार्फत पुरवली जातील. येथील शेतकरी फळाच्या क्वालिटी नुसार पॅकिंग करून त्याची विक्री करतात व पैसे कमवत आहेत दोन बहारा पैकी कोणता बहार आपल्या भागात येऊशक्ती याचा विचार करून पीक लागवड करावे. पुढील काळात पेरुला मागणी वढण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमास गावच्या सरपंच सौ. वैशाली आडसुळ, टेस्टी बाईट कंपनीचे एम. डी. श्री अभिजित उपाध्ये, तसेच जनरल मॅनेजर राजेंद्र जाधव, के. व्हि. के. चे डॉ. रतन जाधव, श्री यशवंत जगदाळे उपस्थित होते, श्री. संतोष गोडसे यांनी सूत्रसंचालन केले व समीर डोंबे यांनी आभार मानले