गगनाला भिडलेल्या महागाईच्या निषेधार्थ ‘वंचित’ करणार आंदोलन
केंद्र व राज्य सरकारचा नोंदवणार निषेध

गगनाला भिडलेल्या महागाईच्या निषेधार्थ ‘वंचित’ करणार आंदोलन
केंद्र व राज्य सरकारचा नोंदवणार निषेध
इंदापूर : प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात नागरिकांची जीवघेणी अवस्था चालू असताना जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.याचा निषेध म्हणून तसेच ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक व्हावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून दि.१६ ऑगस्ट रोजी इंदापूर तहसीलदार कचेरी येथे एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
सध्या केंद्रसरकार व महाराष्ट्र सरकार हे दोन्ही मिळून जनतेच्या जीवाशी खेळत आहेत.या दोन्ही सरकारने पेट्रोल दरवाढ,गॅस दरवाढ,अन्नधान्य दरवाढ,तसेच सर्व जीवानावश्यक वस्तू महाग केलेल्या आहेत. महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडत आहेत. यामध्ये सामान्य जनतेला जीवन जगणे कठीन झाले आहे.अशा आशयाचे लेखी निवेदन तहसीलदार अनिल ठोंबरे आणि पोलिस उप निरीक्षक संजय धोत्रे यांकडे देण्यात आले आहे.
यावेळी अँड.बापूसाहेब साबळे,हनुमंत कांबळे,प्रमोद चव्हाण,अजित अभंगराव,हनुमंत बनसोडे,अमोल भोसले,पंकज बनसोडे,अतुल सोनकांबळे,पवण पवार,अमर मखरे,रमेश जगताप,अविनाश गायकवाड उपस्थित होते.