निंदनीय – अंधश्रद्धेच्या भावनेतून घरातील महिलेचा छळ : अनैसर्गिक कृत्य करायला लावण्याचा धक्कादायक प्रकार.
शुक्रवारी घरात कोणी नसताना सासू आणि दीर यांनी मारहाण केली.

निंदनीय – अंधश्रद्धेच्या भावनेतून घरातील महिलेचा छळ : अनैसर्गिक कृत्य करायला लावण्याचा धक्कादायक प्रकार.
शुक्रवारी घरात कोणी नसताना सासू आणि दीर यांनी मारहाण केली.
बारामती वार्तापत्र
सध्या अंधश्रद्धा बरीच फोफावलेली दिसत आहे असे असतानाच अशीच घटना बारामती तालुक्यात सोमेश्वरनगर परिसरात समोर आलेली आहे. अंधश्रद्धेच्या भावनेतून घरातील महिलेचा छळ करत मांत्रिकाच्या मदतीने अनैसर्गिक कृत्य करायला लावण्याचा धक्कादायक प्रकार बारामती मध्ये घडला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार …त्या पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार महेंद्र माणिकराव गायकवाड, राजेंद्र माणिकराव गायकवाड, कौशल्या माणिकराव गायकवाड, निता अनिल जाधव, मांत्रीक तात्या (नाव पत्ता पुर्ण नाही ) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २५ वर्षांपूर्वी लग्न झालेल्या महिलेला पहिली मुलगी झाली यामुळे तू पांढऱ्या पायाची आहेस. असे वारंवार म्हणून घरातील सदस्यांनी छळ केला. माहेरून पैसे आणावेत याबाबत अनेक वेळा जाचहाट केला होता. भूतबाधा झाली आहे. असे म्हणून तात्या नावाच्या मांत्रिकाला घरी बोलावले होते लिंबू उतरून उतारा टाकने, वेगवेगळे पदार्थ खायला लावणे काहीवेळा अगदीच उपाशी ठेवणे, अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडणे असे प्रकार नेहमी घडत असत.
शुक्रवारी घरात कोणी नसताना सासू आणि दीर यांनी मारहाण केली. तू सैतानाचा अवतार आहेस असे म्हणून. माझ्या कडेने हळदी कुंकवाचे गोल रिंगण करून त्यामध्ये मला बसवले. आणि हाताने काठीने बेदम मारहाण केली. नग्न करून अघोरी कृत्य करण्यास भाग पाडले.
या सर्व प्रकारातून मी माझी कशीबशी सुटका करून घेतली माझ्या शेजारील लोकांना माझ्या रडण्याचा आवाज आला त्यांनी चौकशी केली आणि माहेरी कळवले माहेरच्यांनी येऊन याबाबत पोलिसांकडे रितसर तक्रार दाखल केली. असे बारामती पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीत पिडित महिलेने म्हटले आहे. फिर्यादी वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे हद्दीतील रहीवाशी असल्याने याबाबतचा अधिक तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.