गाडी आडवून लूट करणारे सराईत गुन्हेगार काही तासांत पोलिसांच्या ताब्यात
तुझ्याकडील पैसे दे, नाहीतर तुला सोडणार नाही

गाडी आडवून लूट करणारे सराईत गुन्हेगार काही तासांत पोलिसांच्या ताब्यात
तुझ्याकडील पैसे दे, नाहीतर तुला सोडणार नाही
क्राईम ; बारामती वार्तापत्र
पुणे-सोलापूर महामार्गावर पोलीस स्टेशन हद्दीत पिकअप आडवून मोबाईल चोरून नेणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अनराज अन्सारी (वय 26 कोंढवा ) हे पिकअप घेऊन बेकरीचा चा माल वाहतूक करत असताना भिगवन पोलिस स्टेशन हद्दीत हॉटेल आनंद जवळ दोन इसम लाल रंगाच्या मोटर सायकलवर वरून येऊन पिक अप ला गाडी आडवी मारून शिवीगाळ करत हाणमार केली.
तुझ्याकडील पैसे दे, नाहीतर तुला सोडणार नाही असे म्हणत अन्सारी यांच्याकडील मोबाईल घेऊन पसार झाले.सदर गुन्ह्यात कोणताही पुरावा नसताना फक्त गाडीच्या व आरोपीच्या वर्णनावरून तसेच खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीवरून सदर इसम थेऊर फाटा या ठिकाणी एका हॉटेलवर थांबले असल्याचे समजतात त्यांच्याकडे चौकशी केली असता गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले व त्यांना अटक करण्यात आली नवनाथ बबन शिंदे (वय 30 लोणी काळभोर) व लखन रमेश झेंडे (वय 25 रावणगाव ता. दौंड) ही आरोपींची नावे आहेत.
त्यांच्याकडून चोरी करण्यात आलेला मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कुटी जप्त करण्यात आली असून जबरी चोरी, बलात्कार, मारामारी असे अनेक गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, भिगवन पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन माने, पोलीस हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, पोलीस नाईक विजय कांचन, प्रमोद शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल धीरज जाधव यांनी केली.