
गाड्या चोरणारा आरोपी अटकेत
बारामती तालुका पोलिसांची कारवाई
बारामती वार्तापत्र
सासवड ,बारामती शहर , ग्रामीण या ठिकाणावरून दुचाकी गाड्या चोरणारा आरोपी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून कृष्णा महादेव जाधव वय 23 रा .लालपुरी तालुका इंदापूर येथील आरोपीला दुचाकी गाड्या तोरण्याच्या गुन्हयावरून अटक करण्यात आली आहे.
या आरोपीने सासवड येथून बुलेट तसेच होंडा डियो ही गाडी चोरली असून बारामती येथून ज्युपिटर, युनिकॉर्न, यामाहा एफ झेड अशासारख्या गाड्या चोरल्या आहेत .
1.बारामती तालुका पोलिस स्टेशन गु. र क्र 781/18 ipc 379 – ज्युपितर
2. सासवड पोलीस स्टेशन गु.र. क्र 350/19ipc 379 बुलेट
3.सासवड पोलीस स्टेशन गु.र. क्र 380/19ipc 379 होंडा डियो
4.बारामती शहर पोलिस स्टेशन गु. र क्र 541/19 ipc 379 युनिकॉर्न
5.बारामती शहर पोलिस स्टेशन गु. र क्र 654/19 ipc 379 यामाहा FZ
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख ,अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते ,डी वाय एस पी नारायण शिरगावकर, यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण ,सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे, पोलीस हवालदार दादा ठोंबरे, पोलीस कॉन्स्टेबल विजय वाघमोडे, राहुल पांढरे ,नंदू जाधव, मंगेश कांबळे, विनोद लोखंडे यांनी केली