गायिका राधा खुडे ही इंदापूरचा अभिमान.. प्रवीण भैया माने
हालाखीच्या परिस्थितीशी झुंज देत राधाने आपला शिक्षण व गायनाचा प्रवास पूर्ण केला आहे.
गायिका राधा खुडे ही इंदापूरचा अभिमान.. प्रवीण भैया माने
हालाखीच्या परिस्थितीशी झुंज देत राधाने आपला शिक्षण व गायनाचा प्रवास पूर्ण केला आहे.
निलेश भोंग ; बारामती वार्तापत्र
कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमात तिस-या क्रमांकाचे जेतेपद मिळवणारी वालचंदनगरची गायिका राधा खुडे हिचा प्रवीण भैय्या माने यांनी तिच्या घरी जावून सत्कार केला त्या वेळी ते बोलत होते.
गायिका राधा खुडे ही इंदापूरचा अभिमान आहे. साऱ्यांनीच कर्तव्यबुध्दीने तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे महत्वाचे आहे,असे मत पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी वालचंदनगर येथे बोलताना व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेल्या राधाने केवळ तिचेच नाही तर साऱ्या इंदापूर तालुक्याचेच नाव उज्वल केले आहे.
वालचंदनगर गार्डन चौक येथे वास्तव्यास असणाऱ्या राधाची पार्श्वभूमी गरीबीची आहे. हालाखीच्या परिस्थितीशी झुंज देत राधाने आपला शिक्षण व गायनाचा प्रवास पूर्ण केला आहे. त्यामुळे आजच्या या सत्कारासह प्रवीण माने यांनी राधाला २५ हजार रुपयांची मदत केली.
यावेळी राजेश जामदार बाळासाहेब गायकवाड गौरव पवार राहुल रणमोडे गणेश लंबाते आदी मान्यवर उपस्थित होते.