गारवा हॉटेलच्या मालकाच्या खुनाचे रहस्य उलगडले ; शेजारील हॉटेल मालकाने सुपारी दिल्याचे उघड
व्यावसायिक स्पर्धेतूनच त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आठ जणांना अटक केली आहे.

गारवा हॉटेलच्या मालकाच्या खुनाचे रहस्य उलगडले ; शेजारील हॉटेल मालकाने सुपारी दिल्याचे उघड
व्यावसायिक स्पर्धेतूनच त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आठ जणांना अटक केली आहे.
क्राईम ; बारामती वार्तापत्र
सोलापूर रस्त्यावर असलेल्या गारवा हॉटेल शेजारी अशोका हॉटेल होते. गारवामुळे अशोका हॉटेलचा व्यवसाय होत नव्हता. आणि त्यामुळेच अशोकाच्या चालकांनी एका सराईत गुन्हेगाराला त्यांच्या खुनाची सुपारी दिली असे तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी बाळासाहेब जयवंत खेडेक (वय 56), निखिल बाळासाहेब खेडेकर (वय 24), सौरभ ऊर्फ चिम्या कैलास चौधरी (वय 21), अक्षय अविनाश दाभाडे, (वय 27) करण विजय खडसे (वय 21), प्रथमेश राजेंद्र कोलते (वय 23), गणेश मधुकर साने (वय 20) आणि निखिल मंगेश चौधरी, (वय 20, सर्वजन उरुळी कांचन (ता. हवेली ) या आठ जणांना अटक केली आहे.
यातील आरोपी बाळासाहेब खेडेकर याने आपला भाचा सौरभ चौधरी याला आखाडे यांचा खून करण्यास सांगितले. त्यासाठी त्याला दररोज एक ते दोन हजार रुपये देऊ असे खेडेकर पितापुत्रांनी त्याला सांगितले. त्यानुसार सौरभ याने त्याचा साथीदार नीलेश मधुकर आरते व इतरांच्या मदतीने आखाडे यांचा खून केला अशी माहिती सरकारी वकील संजय दिक्षित यांनी न्यायालयात दिली.
असा होता व्यवसाय
गारवा हॉटेलचा दररोजचा व्यवसाय सुमारे दोन ते अडीच लाख तर अशोका हॉटेलचा व्यवसाय 50 ते 60 हजार होता. गारला बंद असल्यास अशोकाचा व्यवसाय गारवा इतका होत होता. त्यामुळे गारवा हॉटेल कायमचे बंद पडल्यास आपला व्यवसाय वाढेल या उद्देशाने त्यांनी आखाडे यांचा खून केला, असे पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व उपनिरीक्षक दादाराजे पवार अधिक तपास करत आहेत.